आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांच्या आधी विचार केल्याचे फायदे उदंड...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक इतिहासकारांना मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील गाडरवारा १९०१ मध्ये मराठा साम्राज्याचे मुख्यालय म्हणून स्मरणात असेल. तेथे केवळ ६,१९८ लोक राहायचे. ११० वर्षांत येथील लोकसंख्या झाली ६० हजार. हे रजनीश ओशो यांचे लहानपणीचे घर म्हणून ओळखले जाऊ लागले. या रविवारी मी तेथे गेलो तेव्हा अनेक नवीन संस्कृती दिसल्या. मी एका हॉटेलच्या बैठकीसाठी गेलो होतो. तेथे एका तासात तीन वाढदिवसाचे केक कापले गेले. महाविद्यालयीन तरुण-तरुणी कोरसमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. काही लोकांना बोलण्यानंतर कळले की, हे शहर आता आधुनिक जगाचा स्वीकार करत आहे. प्रगतीची आस असणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देत आहे. काही महिला छोट्याशा खोलीत आपला व्यवसाय चालवत आहेत. काही महिलांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. यावरून मला हैदराबादेत ३७ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका व्यवसायाची आठवण झाली. मी ती नुकतीच वाचली. ‘ग्रुमिंग’ आणि ‘स्टायलिंग’ सर्वसामान्य गोष्ट नसताना तरुण बहिणींनी हा व्यवसाय सुरू केला. जागरूकपणा आणि व्यावसायिक कौशल्याची कमतरता ही त्यामागची कारणे. त्या काळी ब्यूटिशियन बनणे महाकठीण काम. आत्मविश्वास आणि माता-पित्यांचे सहकार्य, चार बहिणी अनुराधा चेप्याला, पोल्सानी अन्नपूर्णा आणि जुळ्या बहिणी तक्कल्लपल्ली अनुपमा आमि अनिरुद्धा मिर्यलाने केवळ हैदराबादेत सिकंदराबादपर्यंत सौंदर्य व्यवसायाचा चेहरामोहराच बदलला. गॅरेजमध्ये ब्यूटी पार्लरची कल्पना तुम्हाला कशी वाटते? होय, गॅरेजमध्ये त्यांनी व्यवसाय थाटला. हा विचार त्यांचे वडील तिरुपती राव यांचा. तेव्हा ते नगरपालिकेचे आयुक्त होते. शिक्षण पूर्ण करत मुलींनी सौंदर्य उद्योगातही कौशल्य आत्मसात केले. आश्चर्य म्हणजे वडिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्नही त्याआड आला नाही. त्या पित्याला तुम्ही स्त्रीवादी म्हणू शकता. मुली आणि पत्नीला त्यांनी प्रोत्साहन दिले. अनुराधा आणि अन्नपूर्णाने आपल्या टिळकनगरस्थित घरातील गॅरेजमध्ये ब्यूटी सलून ‘अनूस’ सुरू केले. कॉलनीत मोठा उत्सव साजरा झाला. सारे लोक त्यांच्या परिचयाचे. सार्वजनिक परिचय असूनही त्यांना या कामात कसलाही कमीपणा वाटत नव्हता. सुरुवातीला कमी असलेली ग्राहकसंख्या नंंतर वाढली. त्यानंतर त्यांच्या दोन चुलत बहिणीही या कामी पुढे आल्या. त्यांनी मग ब्यूटी सलूनचा विस्तार केला. त्या आपल्या वडिलांना त्याचे भाडेही द्यायच्या. काका, आत्याने दिलेली वाईट प्रतिक्रिया त्यांनी न ऐकल्यासारखी केली. त्यांचे म्हणणे होते, मुली दुसऱ्यांचे केस कापत नाहीत. लग्नानंतर चारही बहिणी हैदराबाद आणि सिकंदराबादच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाल्या. तेथे शाखा सुरू केल्या. सौंदर्य शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला. पदवी घेतली. आता अनिरुद्धा अमेरिकेत राहते. त्यांनी फ्लोरिडात शाखा सुरू केली आहे. आज जवळपास ५०० मुली त्यांच्या संस्थेत काम करतात. या ब्रँडच्या निर्मितीसाठी त्यांना अनेक वर्षे लागली. आजही त्या तेवढ्याच तडफेने काम करतात. अन्नपूर्णाचेच उदाहरण घ्या. आता ती आजी झाली आहे. मात्र सकाळी ९ वाजता कामासाठी बाहेर न पडल्यास तिला वडिलांची बोलणी खावी लागतात. आपल्या ८५ वर्षीय पित्याचा सर्वांनीच आदर्श घेतला आहे.

फंडा असा : सर्वप्रथम सुरुवात करण्याचा फायदा मिळतो. मग तो गॅरेजमधून सुरू होणारा एखादा छोटा व्यवसाय असो वा कोट्यवधींच्या गुंतवणुकीसह सुरू झालेला मोठा व्यवसाय.

बातम्या आणखी आहेत...