आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Best Of 'Mardani 2' And The Slow Start Of 'The Body'; 'Jumanji: The Next Level' Hits The Two With A Revenue Of Rs 6.4 Crore.

'मर्दानी 2' ची उत्तम तर 'द बॉडी' ची स्लो सुरुवात; 6.4 कोटीच्या कमाईसोबत दोघांवर भारी पडला 'जुमांजी: द नेक्स्ट लेव्हल'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 13 डिसेंबरला रिलीज झालेला राणी मुखर्जी, विशाल जेठवा स्टारर 'मर्दानी 2' ला बॉक्स ऑफिसवरंबा उत्तम सुरुवात मिळाली आहे तर इम्रान हाश्मी, ऋषी कपूर स्टारर 'द बॉडी' प्रेक्षकांना खेचण्यात अपयशी ठरला. मात्र याचदिवशी आलेला हॉलिवूड चित्रपट 'जुमांजी : द नेक्स्ट लेव्हल' ने दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे. जिथे 'मर्दानी 2' ने 3.80 कोटी आणि 'द बॉडी' ने 50 लाख रुपयांसोबत ओपनिंग तिथे 'जुमांजी' चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 6.40 कोटी रुपये होते. 

वर्षात राणीचा सर्वात मोठा हिट, इम्रानचा सर्वात कमी ओपनिंग कमाई असणारा चित्रपट.... 


मागील 5 वर्षांचा राणीचा रेकॉर्ड पाहता 'मर्दानी 2' ने राणीला सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट मिळाला तर इम्रान हाश्मीच्या 'द बॉडी' पहिल्या दिवशी सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला. यादरम्यान सोलो अॅक्टर म्हणून राणीचे 3 आणि इम्रानचे 8 चित्रपट बॉक्स ऑफिसवर आले.  

असा आहे दोघांचा पाच वर्षांचा रेकॉर्ड... 

राणी मुखर्जी

चित्रपट     पहिल्या दिवसाची कमाई 
मर्दानी (2014)3.46 कोटी रुपये
हिचकी (2018)3.30 कोटी रुपये
मर्दानी 2 (2019)    3.80 कोटी रुपये

इम्रान हाश्मी  

चित्रपट     पहिल्या दिवसाची कमाई कमाई
राजा नटवरलाल (2014)6.10 कोटी रुपये
उंगली (2014)3.6 कोटी रुपये 
मिस्टर एक्स (2015)4.5 कोटी रुपये
हमारी अधूरी कहानी (2015)5.04 कोटी रुपये
अजहर (2016)6.30 कोटी रुपये
राज रिबूट (2016)6.30 कोटी रुपये
व्हाय चीट इंडिया (2019)1.71 कोटी रुपये
द बॉडी (2019)50 लाख रुपये

पुढचे दोन दिवस वाढू शकते 'मर्दानी 2' चे कलेक्शन... 


ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्शनुसार पुढील दोन दिवसात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, पॉजिटीव्ह माउथ पब्लिसिटी आणि जबरदस्त रिव्ह्यूजमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे.