आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारी जाहीर हाेण्यास लागले ७२ दिवस; ताेपर्यंत पीडित १३ पट आणि बाधित देशांच्या संख्येत ३ पट वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगावर घाेंगावताेय सर्वात माेठा धाेका- काेराेनाशी संबंधित सर्व काही जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे
  • याअगाेदर ...२००९ मध्ये स्वाइन फ्लू बनला हाेता साथराेग

नवी दिल्ली - चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथून पसरलेला काेराेना व्हायरस किंवा काेव्हिड-१९ मुळे पीडितांची संख्या दरराेज वाढत आहे. आतापर्यंत ११९ देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले लाेक आढळले आहेत. हा राेग पहिल्यांदा सार्वजनिक झाल्यानंतर जागतिक आराेग्य संघटनेने (डब्ल्यूएचआे) त्याला साथराेग जाहीर करण्यासाठी ७२ दिवसांचा वेळ घेतला. तथापि, या कालावधीत, रोगाचा प्रादुर्भाव १३ पट वाढला आहे आणि प्रभावित देशांची संख्या तिप्पट झाली आहे. एकट्या चीनमध्ये या राेगामुळे जवळपास ४ हजार लाेकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या बाहेर इटलीमध्ये सर्वाधिक लाेकांचा मृत्यू झाला आहे. तेथे शुक्रवारी झालेल्या २५० लाेकांच्या मृत्यूनंतर हा आकडा १,२६६ वर गेला आहे. या अगाेदर २००९ मध्ये स्वाइन फ्लूला डब्ल्यूएचआेने साथराेग घाेषित केला हाेता. भारतात ८३ लाेकांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. दाेन लाेकांचा मृत्यू याच्याच मुळे झाला आहे. संपूर्ण देशात विलगीकरण कक्ष स्थापन करून त्याच्याशी लढा देण्याची तयारी सुरू झाली आहे. १२ राज्यात शाळा व महाविद्यालये बंद  केल्या आहेत. लाेकांना अती गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेक शहरातील चित्रपटगृह बंद करण्यात आले आहेत. इटलीमध्ये एका दिवसात २५० जणांचा मृत्यू झाल्यानंतर डब्ल्यूएचआेने युराेपला काेविड-१९ व्हायरसचे मूळ केंद्र जाहीर केले आहे. 
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बाेल्साेनाराे यांच्यापासून ते ब्रिटनचे आरोग्यमंत्री नाडिन डोरिस, ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डट्टन,हॉलीवूड अभिनेता टॉम हॅन्क्स,त्यांची पत्नी रीटा देखील विषाणूच्या संसर्गापासून सुटले नाहीत जगभरातील जवळपास सर्व प्रमुख कार्यक्रम एकतर पुढे ढकलले किंवा रद्द केले जात आहेत. संयुक्त राष्ट्र अमेरिकेने या राेगाशी लढण्यासाठी आपत्काल जाहीर केला आहे. जागतिक आराेग्य संघटनेच्या मते आतापर्यंत ११९ देशांमध्ये काेराेना झाल्याची प्रकरणे मिळत आहे. 

डब्ल्यूएचआेने काेराेनाला महामारी का जाहीर केले?


चीनने ३१ डिसेंबरला काेराेना व्हायरसचा प्रकाेप झाल्याची घाेषणा केली आणि ३० जानेवारी २०२० राेजी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी लागू केली. डब्ल्यूएचआेने त्याला पेनाडेमिक जाहीर करण्यासाठी ७२ दिवस वाट पाहिली. या कालावधीत हा प्रकाेप बहुतांशपणे चीनपर्यंतच मर्यादीत हाेता. चीनने कडक उपाय केल्याने ते शक्य झाले, पण गेल्या दाेन आठवड्यात चीनच्या बाहेर काेराेना व्हायरसने बाधितांची संख्या १३ पट आणि त्यामुळे पीडित देशांची संख्या तीन पट वाढली. उदाहरणार्थ २९ फेब्रुवारीपर्यंत इटलीमधील पीडितांची संख्या ८८८ हाेती. ती एका आठवड्यात वाढून ४,३६३ वर गेली. साथराेगाचे माेठे उदाहरण वर्ष १९१८ ते १९२० पर्यंत पसरलेला स्पॅनिश फ्लू आहे. यामुळे अनेक देशांतील लाेक माेठ्या संख्येने प्रभावित झाले हाेते. अंदाजानुसार २ ते ५ काेटी लाेकांचा मृत्यू यामुळे झाला. डब्ल्यूएचआेने काेराेना व्हायरसला साथराेग घाेषित केल्यानंतर जवळपास सर्व देशांत चार कामे प्रामुख्याने करावे लागतील. परदेशातून येणाऱ्या लाेकांचे स्कॅनिंग करणे, व्यक्ती काेराेना व्हायरस पाॅझिटिव्ह आढळली तर ते नाेटीफाय करणे, लाेकांवर काही निर्बंध घालावे लागतील. काेराेना व्हायरस पीडित असल्याची शंका आल्यास व्यक्तीला तपासणीसाठी सांगितले जाऊ शकते. त्याला लाेक नकार देऊ शकणार नाहीत. संशयित असल्यास लाेकांना देखरेखीखाली ठेवले जाऊ शकते आणि हे बंधनकारक असेल.काेराेना शब्दकाेश. या व्हायरसशी निगडित ते शब्द, ज्यांचा सध्या जास्त वापर सुरू आहे

> पॅनेडेमिक म्हणजे साथराेग

जागतिक आराेग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) साथराेग दाेन प्रकारे मानलेे आहेत. जागतिक साथराेग म्हणजे पॅनेडेमिक आणि क्षेत्रीय साथराेग म्हणजे अॅपेडेमिक. काेराेनाला पॅनेडेमिक मानले गेले आहे. सहा महाद्वीप आणि शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये पसरल्यानंतर डब्ल्यूएचआेने कोराेनाला साथराेग म्हणून जाहीर केले आहे.> कोव्हिड-19/कोरोना
काेराेना व्हायरसचे तांत्रिक नाव सार्स-सीआेव्ही - २ आहे. यामुळे हाेणाऱ्या श्वसनाच्या आजाराला काेराेनाे व्हायरस डिसीज २०१९ म्हणजे ‘काेव्हिड - १९’ नाव दिले आहे.
CO rona VI rus D-isease 2019> सेल्फ क्वारंटाइन


सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार जर तुम्ही इटली, चीन, इराण आणि दक्षिण काेरियासारख्या देशांतून आले असाल, जेथे काेराेना वेगाने पसरत आहे, तर तुम्हाला १४ दिवस तुमच्या घरात सेल्फ क्वारंटाइन म्हणून राहावे लागेल. म्हणजे स्वत:च्या घरात राहून  दुसऱ्यांपासून वेगळे हाेणे.> आर-नॉट  
आर-नाॅट या आरआे एखाद्या व्हायरसची मूळ प्रजनन संख्या असते. याने आजाराची वा व्हायरसची गंभीरता समजून घेता येऊ शकते. जर संख्या एक वा त्यापेक्षा जास्त असेल तर संबंधित आजाराने ग्रस्त असलेली प्रत्येक व्यक्ती काेणा एकाला संक्रमित करू शकते. त्यामुळे राेग पसरण्याचा धाेका वाढताे.

> इन्क्युबेशन पीरियड
संसर्ग हाेण्यापासून लक्षण दिसेपर्यंतच्या कालावधीला इन्क्युबेशन टाइम म्हणतात. काेराेनामध्ये हा कालावधी १४ दिवसांचा आहे. परंतु अनेक प्रकरणांत केवळ पाच दिवसांतही लक्षणे समाेर आली आहेत. अशामध्ये व्हायरसची तीव्रताही वेगवेगळी आहे.> फॅटेलिटी रेट


म्हणजे मृत्यू दर. डब्ल्यूएचआेनुसार काेराेनाचा फॅटेलिटी रेट ३.४ टक्के आहे. परंतु ८० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांपर्यंत मृत्यू झाले आाहे. इराणसारखा देश जेथे वैद्यकीय सुविधा अन्य देशांच्या तुलनेत जास्त कमी आहेत तेथे जास्त मृत्यू झाले आहेत.सोशल डिस्टेन्सिंग 


काेराेना पसरण्याचा धाेका गर्दीच्या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळेच जगभरात अशा प्रकारचे कार्यक्रम पुढे ढकलले जात आहेत, जेथे जास्त गर्दी जमते. ज्याप्रमाणे अमेरिकेत राजकीय रॅली रद्द करण्यात येत आहेत. तेच भारतात आयपीएल स्थगित केले आहे. सामने पुढे ढकलले जात आहेत.

सेलेब्ज. ते मान्यवर चेहरे ज्यांना राेगाने ग्रासले

ब्रिटनच्या आराेग्यमंत्री

ब्रिटनच्या आराेग्यमंत्री नदीन डाॅरिस यांनी स्वत: काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती

ब्राझीलचे राष्ट्रपती बाेल्साेनाराेंची पहिली काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह निघालीऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री

गृहमंत्री पीटर डटन यांनी १३ मार्चला ट्विट करून त्यांचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह असल्याचे सांगितले.

अभिनेता टॉम हॅक्स आणि पत्नी रिटा

ऑस्ट्रेलियाला प्रवास करणारे अभिनेता टॉम हॅक्स यांनी ट्विट करून याची माहिती दिली

कॅनडाच्या पंतप्रधानांची पत्नी
जस्टिन ट्रुडोंची  पत्नी साेफी ट्रुडाे यांची चाचणी पाॅझिटिव्ह निघाली

फॅक्ट चेक. या रोगाशी संबंधित ते दावे, यामागील सत्य तुम्हाला माहिती हवे...

> फेसमास्क उपयोगी नाही

शंभर टक्के सुरक्षेची खात्री नसेलही. मात्र काही संशोधनांनुसार, हे बिगर मास्कच्या तुलनेत पाच पटीने सुरक्षा प्रदान करते. जर तुम्ही एखाद्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संसर्गात आल्यास, तुमचा अर्धा धोका कमी होतो.   


> हे  तापापेक्षा कमी धोकादायक
आहे


याची लक्षणे तापासारखीच आहेत. मात्र या रोगाच्या मृत्यूदराचे प्रमाण गंभीर आहे. हे तापापेक्षा १० पट अधिक धोकादायक आहे. यामुळे दरवर्षी २.९ लाख ते ६.५ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. > यामुळे फक्त वयस्कांचा मृत्यू होतो


असे लोक ज्यांचे आरोग्य बरे आहे आणि ते वयस्क नाहीत. अशा लोकांना कोव्हिड-१९ ची मोठ्या प्रमाणात लागण होणार नाही. मात्र, या रोगात तापाच्या तुलनेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी आजाराचे निदान होणे आणि विलगीकरण कक्षात पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. 

> बाधितासोबत १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिल्यास होते लागण
काही रुग्णालयांच्या गाइडलाइननुसार, बाधित व्यक्तीच्या शिंक आणि खोकल्यामुळे तसेच १० मिनिटे किंवा यापेक्षा जास्त वेळ अशा व्यक्तीच्या संसर्गात राहिल्यास या रोगाची लागण होते. मात्र एखाद्या बाधित जागेचा स्पर्श होण्याच्या कमी वेळेतही लागण होऊ शकते. > लस काही महिन्यांत तयार होऊ शकते


चिनी संशोधकांनी या आजाराचे जेनेटिक स्विक्वेन्स लवकर जारी केल्याने यावरील लस तयार करण्याचे काम सुरू झालेल आहे. मात्र अनेक तपासण्या आणि याचे दुष्परिणामांच्या अभ्यासानंतरच लसीच्या व्यावसायिक निर्मितीचे काम सुरू केले जाईल. > उष्ण किंवा अतिथंड परिसरात विषाणू  निष्क्रिय होत


या विषाणूचा फैलाव उष्ण किंवा दमट यासह थंड भागातही बघितला गेला आहे. यामुळे उष्ण किंवा अतिथंड परिसरात विषाणू निष्क्रिय होईल असे म्हणता येणार नाही.डास चावल्यानेही होतो कोव्हिड-१९


आतापर्यंत हा विषाणू डास चावल्यामुळे पसरत आहे, अशी कुठलीही घटना समोर आलेली नाही. तसेच हँड ड्रायरच्या वापरानंतरही याला रोखता येणार नाही. हात पुन्हा पुन्हा धुणे आणि  अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरनेच याला रोखता येईल. 
 

बातम्या आणखी आहेत...