आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत एक हजार काेटींचा ड्रग्जचा साठा जप्त; नववर्षासाठी तस्करी चौघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशभरात नववर्ष स्वागताच्या तयारीला जाेर चढलेला असतानाच मुंबर्इ पोलिसांच्या अमली पदार्थविराेधी पथकाने पश्चिम उपनगरातील वाकाेला परिसरातून शुक्रवारी सकाळी १०० किलाे अमली पदार्थांचा साठा जप्त केला. अमली पदार्थविराेधी पथकाने फँटानाइल ड्रग्जचा साठा जप्त केला असून अांतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत अंदाजे तब्बल एक हजार काेटी रुपये अाहे. ३११ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर देशभरातील ही सर्वात माेठी कारवार्इ केल्याचा दावा मुंबर्इ पाेलिसांनी केला अाहे. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाेलिसांनी चार जणांना अटक केली असून मुंबर्इ महानगर दंडाधिकाऱ्यांनी एक जानेवारीपर्यंत त्यांना पाेलिस काेठडी सुनावली अाहे. सलीम ढाेला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि घनश्याम तिवारी अशी आरोपींची नावे आहेत.

 

अमेरिकेत बंदी असलेल्या फँटानाइल या रसायनाची मुंबर्इतून माेठ्या प्रमाणावर तस्करी हाेत असल्याची माहिती अमली पदार्थविराेधी पथकाच्या अाझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांनी मिळाली हाेती. त्या पार्श्वभूमीवर युनिटच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम उपनगरातील वाकाेला येथे छापा टाकून धडक कारवार्इ केली. चाैघांची कसून चाैकशी केल्यानंतर पाेलिसांना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका माेटारीमध्ये पांढऱ्या पावडरच्या स्वरूपातील १०० किलाे ड्रग्जचा साठा सापडला. फँटानाइल ड्रग्जचा इतका जास्त प्रमाणावर साठा कशासाठी करून ठेवला, हे ड्रग्ज काेठे घेऊन चालले हाेते याबाबत या चाैघांकडून काेणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. फँटानाइल रसायन अाैषध बनवणाऱ्या एखाद्या कंपनीतून येत असण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली.

 

फँटानाइल ड्रग्जचा अधिक वापर घातक
फँटानाइल हे घातक अाहे. वेदनाशमक तसेच अॅनेस्थेशियासाठी त्याचा वापर केला जाताे. मात्र, या रसायनाचा अधिक वापर केला तर ते अाराेग्यासाठी घातक ठरू शकते. या रसायनाचा जास्त वापर केल्यास उलट्या हाेणे, भीती वाटणे असा त्रास हाेताे. फँटानाइल नशा देणारे ड्रग अाहे. २१०६ मध्ये फँटानाइल ड्रगमुळे हजाराे जणांचा मृत्यू झाल्यामुळे अमेरिकेत या रसायनावर बंदी घालण्यात अाली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चौघांकडे पोलिस सखोल चौकशी करत आहेत. हे ड्रग्ज त्यांनी कुठून आणले, यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का ? याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

दहा किलाेची किंमत १०० कोटी
या चाैघांकडून अांतरराष्ट्रीय बाजारात एक हजार काेटी रुपये किमतीचा शंभर किलाे फँटानाइल रसायनाचा साठा, एक कार अाणि एक अॅक्टिव्हा स्कूटर जप्त करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू अाल्याचे पाेलिसांनी सांगितले. दहा किलाेच्या फँटानाइल ड्रगची किंमत १०० काेटी रुपये याप्रमाणे या १०० किलाे ड्रग्जची बाजारात एक हजार काेटी रुपये किंमत अाहे. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीच्या अासपास अमली पदार्थांच्या माेठ्या कन्साइनमेंट विविध देशांतून निर्यात हाेतात. त्या अाधारावर ही कारवार्इ करण्यात अाल्याचे अमली पदार्थविराेधी अायुक्त शुभदीप लांडे यांनी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...