दिल्ली / दिल्लीमध्ये आकारला गेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड, ट्रक चालकाला भरावे लागले तब्बल २ लाख रुपये 

ट्राफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे लागला एवढा मोठा दंड 

Sep 19,2019 11:52:44 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : मोटर व्हेहिकल अॅक्ट पास झाल्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु होईल. ट्राफिक नियम मोडणाऱ्यांवर अॅक्टनुसार दंड लावला जात आहे. दिल्लीमध्ये काल रात्री आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आकारला गेला. 2 लाख 500 रुपयांचा दंड एका ट्रक मालकाला ओव्हरलोडिंगसाठी आकारला गेला. काल मुकरबा चौकातून भलस्वाकडे जाताना हरियाणाच्या नंबरच्या या गाडीला दंड लागला.

ट्रक ड्रॉयव्हरकडून 56 हजार ओव्हरलोडिंगसाठी 5000 हजार रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे 10 हजार रुपये, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी 10 हजार रुपये, फिटनेससाठी 10 हजार रुपये, परमिट व्हायलेशनसाठी 4 हजार रुपये, इंश्योरेंशसाठी 10 हजार रुपये, पॉल्यूशन सर्टिफिकेट नसल्यामुळे 20 हजार रुपये, न झाकता घेऊन जाण्यासाठी 1000 रुपये आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे दंड आकारला गेला. ओव्हर लोडिंगचा दंड 20 हजार रुपये आहे, तर जेवढे टन अधिक सामान असेल त्याला 2 हजार टक्के कर दिला जाईल. ड्रायव्हर एकूण 18 टन जास्त सामान घेऊन जात होता. हे सर्व मिळून ड्रायव्हरला जी रक्कम द्यावी लागणार आहे ती संपूर्ण रक्कम 2 लाख 500 रुपये होईल.

X