आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Biggest Football League To Begin: Expect 25,760 Crore Revenues In The Champions League This Season

सर्वात माेठ्या फुटबाॅल लीगला सुरुवात : चॅम्पियन्स लीगमध्ये यंदा सत्रात २५ हजार ७६० काेटी रेव्हेन्यूची आशा; ३१ देशांच्या विकास दरापेक्षा अधिक!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - जगातील सर्वात माेठ्या आणि प्रतिष्ठेच्या फुटबाॅल लीगला मंगळवारपासून सुरुवात झाली. या चॅम्पियन्स लीगमध्ये युराेपातील ३२ संघांनी सहभाग नाेंदवला आहे. आता हे संघ चॅम्पियन्सचा किताब जिंकण्यासाठी झंुजणार आहेत. या सहभागी ३२ संघांची आठ गटांत विभागणी करण्यात आली. जवळपास ८ महिन्यांपर्यंत रंगणाऱ्या या लीगमध्ये एकूण १२५ सामने हाेतील .याच सामन्यातून पुढच्या वर्षी ३० मे राेजी चॅम्पियन्स टीम निश्चित हाेणार आहे. 

या स्पर्धेच्या माध्यमातून यंदाच्या सत्रामध्ये २५ हजार ७६० काेटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा आयाेजक युराेपियन आॅफ फुटबाॅल  फेडरेशनला (युइएफए) आहे. त्यामुळे ही लीगच्या माध्यमातून सर्वात माेठी कमाई असणार आहे. ही रक्कम  जगभरातील ३१ देशांच्या विकास दरापेक्षा (जीडीपी) अधिक ठरणारी आहे.  या महसूल कमाईतील ९३.५ टक्के रक्कम  ३२ संघांना  दिली जाणार आहे. क्लबच्या क्रमवारीसह प्रक्षेपण हक्कांसाठी ही रक्कम संघांना दिली जाते.


जगातील सर्वांत श्रीमंत ५० क्लबपैकी ३० चा  समावे
श :  
यंदाच्या सत्राला २५ जुन राेजी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीचे सामने २८ आॅगस्टपर्यंत आयाेजित करण्यात आले हाेते. यादरम्यान काही संघांना थेट स्पर्धेत प्रवेश मिळाला. तर, काहींना पात्रता फेरीत खेळावे लागले.
 

गटातून बाहेर पडणाऱ्या संघांना ११९ काेटी 
चॅम्पियन्स फुटबाॅल लीग ही लीग काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करणारी जगातील दुसरी सर्वात माेठी स्पर्धा मानली जाते. पहिल्या स्थानावर इंग्लिश प्रीमियर लीग आहे. या चॅम्पियन्स लीगच्या गटातूनही बाहेर पडलेल्या संघांच्या वाट्याला प्रत्येकी ११९ काेटी रुपये येतात. यूईएफएच्या वतीने सामना जिंकणाऱ्या संघाला २१ काेटी आणि ड्राॅ करणाऱ्यास ७ काेटी रुपये देण्यात येतात.
 

सर्वाधिक १८ चॅम्पियन स्पेनने दिले, लिव्हरपूल गतविजेता 
स्पेन देशाने  सर्वाधिक १८ विजेते संघ दिले आहेत. लिव्हरपूल हा गतविजेता संघ आहे. सर्वाधिक १३ वेळा चॅम्पियन हाेण्याचा बहुमान स्पेनच्या रिअल माद्रिदने पटकावला आहे. इटलीच्या इंटर मिलानने ७  किताब जिंकून दुसऱ्या स्थानी आहे.
 

तीन वेळच्या चॅम्पियन युनायटेडची अनुपस्थिती 
लीगमधील तीन वेळच्या चॅम्पियन मँचेस्टर युनायटेडला क्लबला यंदा सुमार खेळीचा फटका बसला. त्यामुळे संघ यंदा लीगसाठी पात्रच ठरला नाही. त्यामुळे युनायटेडला यंदा या लीगला मुकावे लागणार आहे. त्यामुळे आता या टीमची नजर पुढच्या सत्रातील स्पर्धेतील सहभागासाठी प्रयत्नशील राहणार आहे.  त्यामुळे सिटीची नजर तयारीवर लागली आहे.
 

लीगमध्ये पाच संघांची किंमत एक मिलियन युराेपेक्षा अधिक 
चॅम्पियन्स लीगमध्ये सहभागी ३२ संघांची मार्केटमध्ये माेठी व्हॅल्यू आहे. त्यामुळे ही रक्कम १.२७ लाख काेटी असल्याचे दिसते. या लीगमधील टाॅप-५ संघांचे मूल्य हे एका मिलियन युराेपेक्षा अधिक आहे.
 

टाॅप-५ माेस्ट व्हॅल्युएबल खेळाडूंत मेसी, राेनाल्डाे नाही
चॅम्पियन्स लीगच्या टाॅप-५ माेस्ट व्हॅल्युएबल खेळाडूंमध्ये बार्सिलाेनाच्या लियाेनेल मेसी आणि युवेंट्सच्या  राेनाल्डाेला स्थान मिळालेले नाही.
 

रिअल माद्रिदसमाेर  पीएसजीचे आव्हान 
विक्रमी १३ वेळच्या चॅम्पियन रिअल माद्रिदला आता सलामीच्या सामन्यात पॅरिस सेंट जर्मन संघाच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. हे दाेन्ही संघ गुरुवारी समाेरासमाेर असतील. रिअल माद्रिद हा लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून आेळखला जाताे. पीएसजी संघाने गत वर्षी उपांत्यपूर्व  फेरी गाठली हाेती. 
 
विक्रमी १३ वेळच्या चॅम्पियन रिअल माद्रिदला आता सलामीच्या सामन्यात पॅरिस सेंट जर्मन संघाच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. हे दाेन्ही संघ गुरुवारी समाेरासमाेर असतील. रिअल माद्रिद हा लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून आेळखला जाताे. पीएसजी संघाने गत वर्षी उपांत्यपूर्व  फेरी गाठली हाेती. 
 

८ गटातील ३२ संघ असे
ग्रुप ए: पीएसजी, रिअल माद्रिद, क्लब ब्रुग, गालाटासारे.  ग्रुप बी: बायर्न म्यूनिख, टॉटेनहम, ओलिंपियाकोस, रियल स्टार बेलग्रेड.  ग्रुप सी: मॅनचेस्टर सिटी, शाख्तर दोनेस्त्क, डायनेमो जागरेब, अटलांटा. ग्रुप डी: युवेंटस, एटलेटिको माद्रिद, बायर लेवेरकुसेन, लोकोमोटिव मॉस्को। ग्रुप ई: लिवरपूल, नेपोली, रेड बुल साल्जबर्ग, जेंक.  ग्रुप एफ: बार्सिलोना, बोरुसिया डॉर्टमंड, इंटर मिलान, स्लाविया प्राग. ग्रुप एच: चेल्सी, अयाक्स, वेलेंसिया, लिलि. 
 

फुटबाॅलचे मार्केट २ लाख काेटींचे
युराेपात फुटबाॅलला सर्वाधिक लाेकप्रियता आहे. त्यामुळे येथील फुटबाॅलचे मार्केट हे २ लाख काेटींच्या घरात आहे. हा आकडा जगभरातील ९१ देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक मानला जाताे.
 

लीग    देश    रेवेन्यू*
प्रीमियर लीग    इंग्लंड    41910
ला लिगा    स्पेन    22575
बुंदेसलिगा    जर्मनी    22100
सीरी ए    इटली    16413
लीग-1    फ्रांस    12996
(*रक्कम काेटीत)