ब्रिटनमधील सर्वात मोठे म्युझिक कॉन्सर्ट सभागृह अशाप्रकारे दिसणार
लंडन - पूर्वोत्तर लंडनच्या स्ट्रॅटफोर्ड शहरामध्ये ब्रिटनचा सर्वात मोठा “म्युझिक कॉन्सर्ट व्हेन्यू’ एमएसजी स्फेयर तयार केला जात आहे. यातील सुमारे ३०० फूट उंच ४०० फूट रुंद विशाल गोलाकाराच्या खाली २१,५०० प्रेक्षक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील. यात १७,५६६ प्रेक्षक बसू शकतील. इतर ३,९३४ प्रेक्षक उभ्या-उभ्या कॉन्सर्ट पाहतील. विशेष म्हणजे या गोलाकार स्ट्रक्चरच्या वरही एलईडी पॅनल लावलेले असेल. यावर जाहिरातीव्यतिरिक्त म्युझिक कॉन्सर्टचे लाइव्ह व्हिडिओ फुटेजही दाखवण्यात येईल. याची डिझाइन मागील आठवड्यातच सार्वजनिक करण्यात आली होती. या स्ट्रक्चरच्या उभारणीसाठी “द मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ कंपनीने स्ट्रॅटफार्डमध्ये ऑलिम्पिक पार्कच्या जवळ ४.७ एकर जमीन खरेदी केली आहे.