Home | Sports | Cricket | Off The Field | The bilateral series won in Australia for the first time

वर्ल्डकपच्या 10 सामन्यांपूर्वीच धोनी रिटर्न्स... ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा जिंकली द्विपक्षीय मालिका; कसोटी-वनडेत कांगारूंना त्यांच्याच भूमीत पराभूत करणारा भारत दुसरा 

वृत्तसंस्था | Update - Jan 19, 2019, 11:00 AM IST

धोनीची पाच वर्षांनंतर सलग ३ अर्धशतके, मालिकावीराचा किताब 

 • The bilateral series won in Australia for the first time

  मेलबर्न- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवत २-१ ने मालिका खिशात घातली. भारताने द्विपक्षीय एकदिवसीय मालिका प्रथमच जिंकली. ऑस्ट्रेलियात कसोटी व एकदिवसीय अशा दोन्ही मालिकांमध्ये भारताने १० सामने जिंकले. याआधी दक्षिण आफ्रिकेने २००९ मध्ये ही कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २३० धावा काढल्या. टीम इंडियाने ४९.२ षटकांमध्ये ३ गडी गमावत २३४ धावा काढल्या. महेंद्रसिंग धोनीने नाबाद ८७ धावा केल्या. सलग ३ सामन्यांत धोनीने अर्धशतक झळकावले. ५ वर्षांनंतर धोनीने ही कामगिरी केली.

  ग्रेट फिनिशर : दोन्ही विजयांत धोनी नाबाद, ४६ वेळा ही कामगिरी
  पहिला वनडे : सिडनी

  51 स्ट्राइक रेट : 53.12

  दुसरा वनडे : अॅडिलेड

  55 स्ट्राइक रेट : 101.8


  तिसरा वनडे : मेलबर्न

  87 स्ट्राइक रेट : 76.32

  - सामन्याचा शेवट करणारा धोनी जगात क्रमांक १ वर. कोहलीने २८ वेळा असे केले.
  - लक्ष्याचा पाठलाग करताना विजय प्राप्त करताना धोनीची सरासरी १०३ एवढी आहे.
  - २०११ मध्ये धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी करून विश्वचषक जिंकून दिला होता.

  मागील विश्वचषकानंतर भारताने ५० वा विजय मिळवला; जगज्जेता ऑस्ट्रेलिया 30 विजयांसह अफगाणिस्तानसोबत
  - २९ मार्चला २०१५ चा विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. तेव्हापासून भारताची कामगिरी पाहता भारत इंग्लंडपेक्षा फक्त एका सामन्याच्या विजयाने मागे.
  - ३० मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरू होणार. यापूर्वी टीम इंडियाला फक्त १० वनडे सामने खेळायचे आहेत.

  ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण संघाची २८ शतके, विराट-रोहितची ३२
  मागील विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण संघाने २८ शतके केली. दुसरीकडे भारतीय संघाने सर्वाधिक ४८ शतके ठोकली आहेत. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने १७ आणि रोहित शर्माने १५ शतके केली आहेत. दोन फलंदाजांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण संघापेक्षा ४ शतके अधिक केली आहेत.

Trending