Home | International | Other Country | The birth of a child from the uterus implanted by Robot

रोबोटने प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून बालकाचा जन्म; महिलेचे नाव समोर आणले नाही

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 11:25 AM IST

जगात अशा प्रकारे गर्भाशय प्रत्यारोपणानंतर के आतापर्यंत केवळ १५ महिलाच आई बनू शकल्या आहेत

  • The birth of a child from the uterus implanted by Robot

    स्टॉकहोम - स्वीडनमध्ये एका महिलेने प्रत्यारोपित गर्भाशयाच्या मदतीने मुलास जन्म दिला आहे. या गर्भाशय प्रत्याराेपण प्रक्रियेत एका राेबाेटचे साह्य घेण्यात आले हाेते. त्यामुळे या तंत्रज्ञानाने मुलास जन्म देणाऱ्या पहिल्या मातेचा गाैरव तिला प्राप्त झाला आहे. सहलग्रेन्स्का युनिव्हर्सिटी-हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संबंधित महिलेचे नाव सांगितलेले नाही.


    याबाबत माहिती देताना डाॅक्टरांनी सांगितले की, यासाठीची प्रत्यारोपण प्रक्रिया २०१७ मध्येच पूर्ण करण्यात आले हाेते. त्या वेळी एका ब्रेन डेड महिलेचे गर्भाशय संबंधित ३६ वर्षीय महिलेत प्रत्याराेपित केले गेले हाेते. १० महिन्यांपूर्वीच तिची प्रजनन क्षमतेसंबंधीची तपासणी केली गेली. त्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गर्भधारणा केली. जन्मावेळी मुलाचे वजन २.९ किलो हाेते. आई व मुलगा दाेघांची प्रकृती उत्तम आहे. जगात अशा प्रकारे गर्भाशय प्रत्यारोपणानंतर के आतापर्यंत केवळ १५ महिलाच आई बनू शकल्या आहेत. त्यातील ९ महिलांवर स्वीडनमध्ये प्रत्याराेपण झाले. तथापि, रोबोटद्वारे ५ महिलांत गर्भाशय प्रत्यारापेण केले गेले असून, त्यापैकी याच प्रकरणात यश आले.

Trending