Home | Khabrein Jara Hat Ke | The birth of December 31, in South Korea, was become two years old on January 1

दक्षिण कोरियात ३१ डिसेंबरला जन्मणारे मूल १ जानेवारीला होते चक्क दोन वर्षांचे

वृत्तसंस्था | Update - Apr 13, 2019, 10:08 AM IST

द. कोरियात वय मोजण्याच्या परंपरेला विरोध, ती बंद करण्यासाठी संसदेत मांडला जाणार प्रस्ताव

  • The birth of December 31, in South Korea, was become two years old on January 1

    सेऊल - दक्षिण कोरियातील देईजिओनमध्ये ली डाँग किल यांच्या मुलीचा जन्म ३१ डिसेंबर २०१८ रोजी झाला. आप्तेष्टांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी १ जानेवारीला पुन्हा अशाच शुभेच्छा सुरू झाल्या. कारण त्यांच्या मुलीने या दिवशी चक्क वयाची दोन वर्षे पूर्ण केली होती. तुम्हाला प्रश्न पडेल की, असे कसे काय शक्य आहे? मात्र, हे सत्य आहे. कोरियन संस्कृतीमध्ये वय मोजण्याची एक विशिष्ट प्रणाली आहे. मूल जन्मले की त्याचे वय एक वर्ष मानले जाते आणि त्याचे वय त्याच्या जन्मदिनाऐवजी नव्या वर्षाच्या हिशेबाने वाढत जाते. अशा प्रकारे ३१ डिसेंबरला जन्मलेले मूल जन्माच्या दुसऱ्याच दिवशी चक्क दोन वर्षांचे होते. म्हणूनच द. कोरियन माणसाचे घाेषित वय पाश्चिमात्य परंपरेतील वयाच्या हिशेबापेक्षा एक किंवा दोन वर्षांहून अधिक असते. आता द. कोरियात लोक या परंपरेला विरोध करत आहेत. प्राचीन परंपरेमुळे पडणारा वयातील हा बदल आता थांबायला हवा, असे या लोकांना वाटते.

    जागतिक पातळीवर वय मोजण्याची जी पद्धत आहे तीच या लोकांना आता हवी आहे. सध्या या लोकांचे दुहेरी वय आहे. ही पद्धत बदलण्यासाठी आता संसदेत प्रस्ताव मांडला जात आहे. वास्तविक, वय मोजण्याची ही पद्धत चीनमध्ये सुरू झाली होती. मात्र, कालांतराने कोरियात या पद्धतीचा वापर सुरू झाला. साधारणपणे कोरियन माणसे परंपरा जपणारी म्हणून ओळखली जातात. परंतु, आता तेच याला विरोध करत आहेत. स्पर्धेच्या या युगात मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा शिक्षणाचे क्षेत्र असो, कोरियन माणूस पिछाडीवर राहायला नको म्हणून येथील लोकांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रणाली हवी आहे. कोरियातील खासदार ह्यांग जू हांग म्हणाले, यासाठी संसदेत लवकरच दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे. या माध्यमातून वय मोजण्याची प्राचीन परंपरा बंद होईल.

    चीन, जपानमध्ये पूर्वीच बंद झाली आहे ही परंपरा

    वय मोजण्याची ही परंपरा पूर्व आशियाई देशांत चीन आणि जपानमध्येही होती. मात्र, काळानुरूप बदल करत या देशांनी ही पद्धत बंद केली. फक्त कोरियातच ही परंपरा आजही पाळली जात आहे. पुढील महिन्यात संसदेतील प्रस्तावानंतर ही पद्धत बंद होईल.

Trending