आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता भाजपची, विधिमंडळात प्रश्न विचारण्यातही भाजपच आघाडीवर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधिमंडळात विरोधकांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करत जनतेचे प्रश्न धसास लावायचे असतात. यात विरोधी पक्षाची मोठी जबाबदारी असते. मात्र २०१४-१९ या काळात राज्य विधिमंडळात सत्ताधारी भाजपचे आमदार प्रश्न विचारण्यात अग्रेसर राहिले असून विरोधकांनी आपली जबाबदारी निभावली नसल्याचे चित्र मुंबईच्या संपर्क संस्थेच्या उभ्यासातून पुढे आले आहे. 


गेल्या चार वर्षात भाजपकडून २५५७, कॉंग्रेस २५४९, शिवसेना २४३६ व राष्ट्रवादीकडून १३३६ प्रश्न विधिमंडळात उपस्थित केले होते. माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार असून या पक्षाने केवळ २ प्रश्न उपस्थित केले. आरोग्यावर काँग्रेसने सर्वाधिक १८४, तर शिक्षणावर भाजपने सर्वाधिक १८७ प्रश्न उपस्थित केले. महिलांच्या प्रश्नासंदर्भात भाजप आणि काँग्रेसने समसमान २२ प्रश्न उपस्थित केले. 


बेरोजगारी आणि धोरणविषयक विषयांवर सर्वाधिक प्रश्न भाजपने विचारले. बालक, पाणी आणि शेती या विषयांवरचे सर्वाधिक प्रश्न काँग्रेसने मांडले. शेकाप, रासप, एमआयएम, भारिप बमसं, मा. कम्युनिस्ट पक्षांकडून महिला या विषयावर एकही प्रश्न विचारला गेला नाही. 


कुणी कोणत्या विषयावर विचारले प्रश्न 
ज्या पक्षाचे आमदार अधिक संख्येने त्यांचे प्रश्न अधिक, हे गृहतिक मोडीत निघाले आहे. 
कारण शेकापचे विधानसभेत 3 आमदार त्यांनी विचारले 172 प्रश्न 
सेनेपेक्षा काँग्रेस आमदारसंख्या 21 ने कमी आहे. 
113 प्रश्न अधिक उपस्थित केले काँग्रेसने सेनेपेक्षा. 
रासप व सपच्या एकेका आमदाराने प्रत्येकी 51 आणि 49 प्रश्न उपस्थित केले होते. 


पक्षांची आवडनिवड 
- भाजप 
2557 प्रश्न विचारले 
619 गैरव्यवहार, घोटाळ्यांवर 
- राष्ट्रवादी 
1336 प्रश्न विचारले 
त्यात 92 प्रश्न शेती तर 52 प्रश्न बालकांशी निगडीत 
- शिवसेना 
2436 प्रश्न विचारले 
446 प्रश्न घोटाळ्यांवर 
- काँग्रेस 
2549 प्रश्न विचारले 
209 शेतीवर सर्वाधिक प्रश्न 


भाजपला रोजगाराची चिंता 
बेराेजगारीवर भाजप आमदारांनी विधिमंडळात सर्वाधिक ३५ प्रश्न उपस्थित केले . याचा अर्थ भाजपला राज्यातील वाढत्या बेराेजगारीची चिंता सतावत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...