आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षे मजबुतीने काम करेल : फडणवीस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजपच्या नेतृत्वात राज्यात सरकार पाच वर्षे मजबुतीने काम करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. भाजप विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यभरासह मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनोद तावडे, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, विनायक मेटे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, महायुतीतील आपले मित्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. आपले एक मित्र सोबत राहीले नाहीत. मात्र आपली बांधिलकी महाराष्ट्रातील जनतेशी असल्याने अजित पवार यांच्या समर्थनातून एक मजबूत सरकार देण्याकरता निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी


पाच वर्षे अत्यंत ताकदीने आणि मजबुतीने हे सरकार काम करेल, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र तयार कऱण्याकरता आणि विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार काम करेल, असा विश्वास आपण देतो. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपले सरकार स्थापन झाले, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो.
म्हणून अजित पवारांचा पाठिंबा

'जनतेने स्पष्ट जनादेश देऊनही शिवसेनेने युती मोडीत काढली. यामुळे राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या सहीचे पत्र आपल्याला सरकार स्थापनेसाठी समर्थन म्हणून दिले. या नंतर आम्ही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींना कळवून आम्हाला सकाळी शपथविधीसाठी बोलावले. आपण अजित पवार आणि सरकार स्थापनेसाठी समर्थन देणाऱ्या सर्व आमदारांचेही अभिनंदन करतो,' असे फडणवीस यांनी सांगितले.

आपण सुरुवातीच्या काळातच शरद पवारांना कल्पना दिली


२४ ऑक्टोबरला निकाल लागल्यानंतर कुणीही सरकार स्थापन करु शकले नाही. मात्र आमच्या बैठकांतील चर्चा संपतच नव्हती. यामुळे पुढे स्थिर सरकार कसे मिळणार असा मला प्रश्न पडला. अापण सुरुवातीच्या काळातच या सर्व गोष्टी पवार साहेबांना सांगितल्या होत्या. जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नव्हते. यामुळे नव्या आघाडीशिवाय सरकार स्थापन हाेणार नव्हते. महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी सरकार स्थापना महत्त्वाची होती. स्थिर सरकारच्या दृष्टीनेच आपण हा निर्णय घेतला. - अजित पवार, उपमुख्यमंत्री