आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे - भाजपचे पदाधिकारी रात्री ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात शिरले अन् रात्री १२ वाजता कार्यालयातून बाहेर पडले, असा गंभीर अाराेप अामदार अनिल गाेटे यांनी केला. छाननीच्या प्रक्रियेवर निकाल बाकी असताना निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात शिरण्याचे कारण काय, असा प्रश्न करीत गाेटे यांनी घडलेल्या प्रसंगाची क्लीप टॅबवर दाखवली. या वेळी अापल्या कार्यकर्त्यांनी जाब विचारायचा प्रयत्न केला तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी उर्मटपणे वागले, असा अाराेपही गाेटे यांनी केला. अापण अामदार अाहे. तेही भाजपत अाहे. तरीही अशी वागणूक मिळत असेल तर जनतेला कशी वागणूक मिळेल, असा प्रश्नही त्यांनी केला.
शहरातील ज्या प्रभागासाठी भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल व इतर जण रात्री ११ वाजता निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात शिरले. तेथील सीसीटीव्ही फुटेज व अधिकाऱ्यांच्या सीडीअारची मागणी महापालिका अायुक्तांकडे केली अाहे, असेही गाेटे यांनी सांगितले. मुळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयानजीक जमाव जमवता येत नाही. त्याचबराेबर उमेदवाराव्यतिरिक्त काेणाचा संबंध नसेल तरीही या कार्यालयात जाता येत नाही. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अायाेगाच्या नियमांचेही उल्लंघन केले अाहे.
या वेळी त्यांनी टॅबवर रात्री चित्रीत केलेला प्रसंग दाखवला. या वेळी अधिकारी कसे वागतात, तेही दाखविले. गुंडांना भाजपमध्ये घ्यायला अापण विराेध केला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुंड व गुन्हाेगारांना पक्षात प्रवेश दिला. त्यांना उमेदवारीही दिली. त्यानंतर अाता त्यांचा उपयाेगही करून घेतला जात अाहे. भाजपचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, नंदू साेनार, काकडे असे काही जण गुरुवारी रात्री छाननी प्रक्रिया सुरू असताना निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात शिरले. त्यानंतर ते रात्री १२ वाजता तिथून बाहेर पडले. त्यांचा तिथे काय संबंध? हाच जळगाव पॅटर्न अाहे का? त्यामुळे संशय अालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मागविले अाहे. तसेच अधिकाऱ्यांचा सीडीअारही मागवला अाहे. या अधिकाऱ्यांमधील २१ पैकी ११ अधिकारी जळगाव जिल्ह्यात कार्यरत अाहेत. विशेष म्हणजे यातील काहीजण जळगाव महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतही हाेते. विराेधी पक्षाचे नेते भाजपवर गुंडांना प्रवेश दिल्याचा अाराेप करायचे. अाता अापणच ते अनुभवले, असेही गाेटे यांनी सांगितले.
दम असेल तर या पदाधिकाऱ्यांनी सरळ निवडणूक लढावीे
अधिकाऱ्याच्या कार्यालयात रात्री घडलेला प्रसंग टॅबवर दाखविताना.
जागांवर परिणाम हाेईल अशी अद्दल भाजपला घडवेल
पंतप्रधान नरेंद्र माेदी एकीकडे काॅंग्रेसचे उदाहरण देऊन सांगतात की, त्या पक्षाने गुंडांचा भरणा करून निवडणूक िजंकल्या. अाता भाजपचीही तीच स्थिती झाली अाहे. मात्र, देशभरातील लाेकसभेच्या जागांवर परिणाम हाेईल, अशी अद्दल भाजपला घडवल्याशिवाय राहणार नाही. हा संपूर्ण शहरातील सहा लाख लाेकसंख्येचा प्रश्न अाहे. गुंड अाणि गुन्हेगार महापालिकेत जातील तर शहराचे वाटाेळे हाेईल, याची साधी कल्पनाही भाजपचे मंत्री व पदाधिकाऱ्यांना नाही, असे म्हणता येणार नाही.
मुख्यमंत्र्यांना विचारताे, अशी निवडणूक जिंकणार?
धुळ्यासारख्या लहान महापालिकेसाठी मंत्र्यांनी ताकद पणाला लावली अाहे. मात्र लहान महापालिकेसाठी प्रतिष्ठा पणाला लावू नका. जनता सहन करणार नाही. हे यापूर्वी सिद्ध झाले अाहे. मी मुख्यमंत्र्यांना विचारताे की,अापण अशाच पद्धतीने निवडणूक जिंकणार अाहात का? रात्रीच्या सुमारास अधिकाऱ्यांकडे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांना सरळ अाव्हान अाहे की, त्यांनी सरळ निवडणूक लढवावी. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा व गुंडांचा वापर भाजपने केला तर जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही गाेटे यांनी सांगितले.निवडणूक अायाेगाकडे या सगळ्या प्रसंगाची चित्रफित सादर करणार अाहे. कारवाई झालीच पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.