आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदी हिंसाचारावर का उतरल्या हे आता जनसागर पाहून मला समजले : मोदी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकूरनगर- परदेशात राहण्यासारखी परिस्थिती नसलेल्या लोकांनी भारतात नाही तर जायचे तरी कोठे? त्यांना न्याय किंवा सन्मानाची वागणूक मिळायला नको का? नवे नागरिकत्व विधेयक अशा लोकांना त्यांचा हक्क मिळवून देत आहे. परंतु काही लोक विरोध करू लागले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शनिवारी त्यांनी ठाकरपूर व दु्र्गापूरमध्ये जाहीर सभा घेतल्या. 

 

ममतांच्या बालेकिल्ल्यात शनिवारी मोदींनी जाहीर सभा घेतली. या सभेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. प. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर अनेक हल्ले झाले. दीदी हिंसाचार करण्यावर का उतरले हे मला आजची गर्दी पाहून समजले, असा टोला मोदींनी लगावला. राज्यात एक प्रकारची हुकूमशाही सुरू आहे. राज्यातील जनता भाजपला समर्थन देत असल्यामुळे ममतांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसते आहे. खरे तर फाळणीतून दोन देश झाले. लोकांना त्यांच्या इच्छेनुसार देशाची निवड करण्याचे स्वातंत्र्यही दिले गेले. मात्र हिंदू, शीख, जैन व पारशी समुदायाला इतर देशांत अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच आम्ही नागरिकत्व विधेयक आणले. आम्ही तृणमूलला संसदेत या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. परंतु त्यांनी दिला नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली. दुर्गापूर येथील सभेत मोदींनी ममता यांच्या सरकारने राज्यातील मध्यमवर्गीयांचे स्वप्न धुळीस मिळवल्याचा आरोप केला. सत्तेवर आल्यापासून ममतांनी डाव्या पक्षांच्या पावलावर पाऊल ठेवून हुकूमशाहीची वाटचाल सुरू केली आहे. तृणमूलने लोकांच्या आकांक्षा, स्वप्न धुळीस मिळवले. मात्र केंद्र सरकारने कायम लोकांच्या आकांक्षांचा विचार केला. त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

 

सभास्थळ लहान 
ठाकूरपूरमध्ये मोदींच्या सभेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गोंधळ पाहून मोदींनी केवळ १४ मिनिटांत भाषण आटोपले. त्याचबरोबर शांतता राखण्याचेही आवाहन केले. सभास्थळ गर्दीच्या मानाने लहान होते. 

 

निशाणा का : पंतप्रधान मोदींना ममता, मायावती, प्रियंकांकडून आव्हान 
दोन आठवड्यांपूर्वी कोलकात्यात ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाची महाआघाडीची सभा घेतली होती. ममतांच्या निमंत्रणावरून तेव्हा २२ राजकीय पक्ष व ४४ नेते सभेत सहभागी झाले होते. विरोधी पक्ष ममतांकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहत आले आहेत. उत्तर प्रदेशात सपा व बसपा यांची आघाडी झाली. मायावती पंतप्रधान होतील का? या प्रश्नावर अखिलेश यांनी पुढील पीएम उत्तर प्रदेशातील असेल, असे संकेत दिले होते. त्यानंतर काँग्रेसने प्रियंका गांधी-वढेरा यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. त्यांच्यात लोक दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी पाहतात. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. 

 

विरोधकांकडे महिला नेतृत्व : यशवंत सिन्हा 
विरोधी पक्षांकडे बळकट महिला नेतृत्व आहे. जनता आगामी निवडणुकीत महिला नेतृत्वाला मतदान करेल, अशी भविष्यवाणी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे. भाजपसाठी हा त्रस्त होण्याचा काळ आहे. कारण पक्ष तीन राज्यांत पराभूत झाला आहे.

 

मोदींची महिलाशक्ती : 
मोदींच्या २६ सदस्यीय कॅबिनेटमध्ये ६ महिला आहेत. सर्वात महत्त्वाच्या ५ सदस्यीय कॅबिनेटच्या समितीत २ महिलांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा समावेश. सरकारने बेटी बचाओ-बेटी पढाओचे अभियान चालवले, उज्ज्वला गॅस योजना चालवली. 

 

राजकीयदृष्ट्या महिला नेत्यांत बलाढ्य कोण? 
ममता : 

३४ वर्षांपूर्वीच्या डाव्या सरकारला २०११ मध्ये सत्तेवरून खाली खेचणाऱ्या नेत्या म्हणून ममता बॅनर्जींची ओळख आहे. त्या करारी नेत्या म्हणून परिचित आहेत. 

 

मायावती : 
महिला असणे हे मायावती यांच्या कारकीर्दीसाठी कधीही आडवे आलेले नाही, असे बसपा प्रवक्ता सुधींद्र भदौरिया यांनी सांगितले. त्यांनी पक्षाला शिखरावर पोहोचवले आहे. 

 

प्रियंका
प्रियंकांचा औपचारिक प्रवेश भलेही २०१९ मध्ये झाला. परंतु त्या गत २० वर्षांपासून राहुल व सोनिया गांंधी यांच्या मतदारसंघांत सक्रिय आहेत. 


 

बातम्या आणखी आहेत...