आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Bodies Of Two Friends Were Found In The Field At Dudhpuri In Ambad Taluka; The Bodies Were Overnight In The Water

शेततळ्यात दोन मित्रांचे मृतदेह आढळले, अंबड तालुक्यातील दूधपुरी येथील घटना; रात्रभर मृतदेह पाण्यात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अंबड : जिवलग मित्र असलेली दोन शाळकरी मुले शनिवारी संध्याकाळी सायकल घेऊन घराबाहेर पडली. दोघांच्याही घरच्यांना ते मित्राच्या घरी जेवण करून झोपले असावेत, असे वाटले. परंतु सकाळी दाेन्ही मित्रांच्या कुटुंबीयांनी एकमेकांकडे अापल्या मुलाविषयी विचारणा केली असता, दोघेही घरी नसल्यामुळे शोधाशाेध सुरू झाली. त्यांची शेततळ्याजवळ सायकल दिसल्याने सर्व जण तळ्याजवळ गेले. मात्र तेथे दोघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. ही दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील दुधपुरी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. सिद्धेश्वर रामकिसन धांडे (१६), शुभम कल्याण पाटोळे (१४) अशी मृतांची नावे आहेत.

सिद्धेश्वर धांडे हा परिसरातील पानेगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकतो तर शुभम कल्याण पाटोळे हा गावातीलच जिल्हा परिषद शाळेत आठवीत शिक्षण घेत होता. दोन्ही कुटुंबीयांचे गावात घर आहे. परंतु, शेत दूर असल्याने १५ वर्षांपासून दोघांचेही कुटुंबीय शेतातच राहतात. सिद्धेश्वर व शुभम जीवलग मित्र. दोघांचेही एकमेकाच्या घरी दररोज जाणे येणे राहायचे. अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी मुक्कामी राहायचे. शनिवारी दोघेही जेवण करून सायंकाळी सायकल घेऊन घराबाहेर पडले. रात्र झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबीयास ते एकमेकाच्या घरी असतील असे वाटले होते. परंतु, सकाळी ६:३० वाजले तरी दोघेही घरी न आल्याने एकमेकांच्या घरी चौकशी केली. गावातही शोध घेतला. काहीच थांगपत्ता लागला नाही. तेव्हा दलसिंग राठोड यांच्या शेततळ्याजवळ त्यांची सायकल दिसून आली. या शेततळ्यात पाणी भरण्याचे काम सुरू होते. शेततळ्यात १० ते १२ फूट पाणी आहे. शेततळ्याजवळ त्यांची सायकल आढळून आली असल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी शेततळ्यात बघितले असता त्यांचे मृतदेह आढळले. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, जमादार जॉन पिल्ले, कन्हैया भांडारकर, विशाल लोखंडे, महेश खैरकर, साळवे आदींनी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल केले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पाटोळे यांना होता एकुलता एक मुलगा; धांडे यांचाही आधार गेला

कल्याण पाटोळे यांना तीन मुली आहेत. शुभम हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्यांचा आधार गेल्याने त्यांना काहीच सूचत नव्हते. रामकिसन धांडे यांना दोन मुले, एक मुलगी अाहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यातच त्यांचा पाय मोडलेला आहे. मोठा मुलगा समाधान धांडे हा दलसिंग जाधव यांच्याकडे सालदार म्हणून काम करतो. घराचा उदरनिर्वाह एकाच व्यक्तीवर असल्याने घरची कामे व वडिलांची सेवा शुभम करायचा. त्यांचा एक आधार गेल्याने तेही शाेकसागरात बुडाले.
सिद्धेश्वर धांडे आणि शुभम पाटोळे

बातम्या आणखी आहेत...