Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | The body of the married woman on the building

काॅलेजराेडच्या इमारतीवर विवाहित तरुणीचा मृतदेह, घातपाताचा संशय

प्रतिनिधी | Update - Jan 10, 2019, 10:23 AM IST

अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल

 • The body of the married woman on the building

  नाशिक - कॉलेजराेड परिसरातील एका व्यावसायिक संकुलाच्या इमारतीवर तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. तरुणीचा गळा आवळून खून केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनोळखी व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोडवरील पाटील लेन नंबर ४ मधील सत्यम लीला टॉवर या इमारतीच्या टेरेसवर बुधवारी (दि. ९) सकाळी पायल जयेश दामोदर (२५) या तरुणीचा मृतदेह सापडला. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मृत महिलेची आई सरला परदेशी यांनी तरुणीची ओळख पटवली. टेरेसवर काही संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही तरुणी टेरेसवर का गेली, कुणासोबत गेली, कधी गेली याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता नेमकी माहिती मिळू शकली नाही. ही व्यावसायिक इमारत असल्याने येथे विविध कंपन्या, व्यावसायिकांची कार्यालये आहेत. तिचा पती जयेश दामोदर याचा पोलिस शोध घेत आहेत.

  इमारतीच्या टेरेसवर तरुणीचा मृतदेह सापडल्याने तेथील विविध कार्यालयांचे कर्मचारी, दुकानदारांमध्ये चर्चा सुरू हाेती. या तरुणीला कुणी ओळख नसल्याने ती येथे का आली याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याने झाले आहेत.


  घातपाताचा संशय

  तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. तिच्या आईने ओळख पटवली आहे. मंगळवारी रात्री उशिरा तिचा खून केल्याची शक्यता आहे. पथक संशयिताच्या मागावर आहे. लवकरच गुन्हा उघडकीस येईल. - किशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक, गंगापूर

Trending