आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Boeing 737 Max Aircraft Is Likely To Cease Production After Suffering The Biggest Loss

सर्वाधिक तोटा सहन केल्यानंतर बोइंग 737 मॅक्स विमानाचे उत्पादन बंद करण्याची शक्यता, सध्या महिन्यात 42 विमाने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - अमेरिकेतील विमान निर्माता कंपनी बोइंगला जून तिमाहीमध्ये ३४० कोटी डॉलर (सुमारे २३ हजार कोटी रुपये) चा तोटा झाला आहे. जगभरातील ७३७ मॅक्स विमान उभी राहिल्याने कंपनीला हा तोटा सहन करावा लागला आहे. आधी इंडोनेशिया आणि नंतर इथियोपियामध्ये बोइंगच्या या मॉडेलच्या विमानांचा अपघात झाला होता. दोन्ही अपघातांमध्ये एकूण ३४६ प्रवाशांच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरातील जवळपास सर्वच देशांतील नियामकांनी ७३७ मॅक्स विमानांचे संचालन बंद केले होते. यामुळे बाेइंगला हवाई वाहतूक करणाऱ्या अनेक कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागत आहे. 


कंपनीने तिमाही निकाल जारी केल्यानंतर सांगितले की, जर ७३७ मॅक्स विमान दीर्घ काळापर्यंत उड्डाणासाठी वापरण्यात आले नाही, तर त्यांचे उत्पादन बंद करावे लागू शकते. बोइंगचे सीईओ डेनिस मुइलेनर्ग यांनी अलीकडेच ७३७ मॅक्स विमान आॅक्टोबरपासून पुन्हा उड्डाणासाठी झेपावणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच दरम्यान बोइंगने असा इशारा जारी केला आहे. मुइलबर्ग यांनी सांगितले की, ही विमाने पुन्हा सेवेमध्ये दाखल व्हावी यासाठी कंपनी पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी जास्त कालावधी लागत असेल तर कंपनी या विमानाचे उत्पादन कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.


जगभरातील १५० देशांतील अनेक हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्या बाेइंगकडून विमान खरेदी करतात. अलीकडच्या काळात बोइंगच्या ७३७ मॅक्स विमानाचे उड्डाण सुरू होईल, असे कोणतेच संकेत या देशांतील नियामकांनी दिलेले नाही. या दोन्ही विमान अपघातांआधी बाेइंगच्या वतीने दर महिन्याला बनण्यात येणाऱ्या ७३७ मॅक्स विमानांची संख्या ५२ होती. मात्र, आता ही संख्या ४२ झाली आहे. बोइंगने गेल्या २२ वर्षांत कोणत्याही विमान मॉडेलचे उत्पादन बंद केलेले नाही. याआधी कंपनीने १९९७ मध्ये ७४७ मॉडेलच्या विमानाचे उत्पादन २० दिवसांसाठी बंद केले होते. त्या वेळी स्थिती उलटी होती. ७४७ विमानांची मागणी अत्यंत जास्त होती आणि त्या मानाने कंपनीला पार्ट््सचा पुरवठा होत नव्हता. 


७३७ मॅक्स विमानाच्या अपडेटेड सॉफ्टवेअरच्या २२५ चाचण्या
बोइंगने सांगितले की, त्यांनी ७३७ मॅक्सच्या सॉफ्टवेअरला अपडेट केले आहे. सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाने इंडोनेशिया आणि इथियोपियामध्ये अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोइंगने आतापर्यंत २२५ वेळा सॉफ्टवेअर चाचण्या घेतल्या आहेत. जवळपास सर्व चाचण्यांचा अहवाल जगभरातील सर्व हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्या आणि नियामकांना पाठवण्यात येतो.

बातम्या आणखी आहेत...