आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'तुम्ही एका पक्षाचे नेते नसून मुख्यमंत्री आहात\' मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना खडसावले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासातील संथगतीवरून मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का, अशा शब्दांत कोर्टाने मुख्यमंत्र्यांना खडसावले. 


दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी झाली. मुख्यमंत्री काय करताहेत? त्यांच्याकडे गृह खात्यासह ११ खाती आहेत. त्यांना किंवा अधिकाऱ्यांना तपासातील अडथळे दूर करण्यासाठी वेळ नाही का? तुम्ही एका पक्षाचे नेते नसून मुख्यमंत्री आहात, अशा शब्दांत न्यायालयाने खडसावले. प्रत्येक वेळी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो हे लज्जास्पद असल्याचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या पीठाने म्हटले.  

बातम्या आणखी आहेत...