आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलचा सिरियातील इराणी तळांवर बॉम्बहल्ला, ११ लढवय्ये ठार झाल्याचा निरीक्षकाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरूत  - इस्रायलने रविवारी रात्रभर सिरियात केलेल्या बॉम्बहल्ल्यात सरकार समर्थक ११ जण ठार झाल्याचा दावा युद्ध निरीक्षकाने केला आहे. इस्रायली लष्कराने सोमवारी पहाटे इराणच्या अनेक प्रतिष्ठानांना लक्ष्य केले. त्याआधी सिरियातून रॉकेट डागण्यात आले होते. मानवी हक्काशी संबंधित सिरियन निरीक्षकाने सांगितले की, गेल्या वर्षी मे महिन्यानंतर इस्रायलचा हा सिरियातील मोठा हल्ला होता.


 लेबनॉनमधील शिया चळवळ हिजबुल्लाहाचे शस्त्रागार आणि इराणी लढवय्यांवर हल्ले चढवण्यात आल्याचे सांगण्यात येते. आपली कारवाई इराणी रिव्होल्यूशन गार्ड््सच्या एका तुकडीविरुद्ध असल्याचा दावा इस्रायल डिफेन्स फोर्सेसने केला आहे.  क्षेपणास्त्रांनी राजधानी दमास्कस विमानतळानजीक विविध ठिकाणी बॉम्बहल्ले केले. याशिवाय दमास्कसच्या दक्षिणेकडील थाला लष्करी तळालाही लक्ष्य करण्यात आले. आपला शत्रू इराणने शेजारच्या सिरियात प्रवेश करू नये, अशी इस्रायलची इच्छा आहे. गेल्या मे महिन्यात इस्रायलने इराणच्या ठिकाणांवर निशाणा साधत केलेल्या हल्ल्यात सरकार समर्थक ११ इराणी ठार झाले होते. इस्रायलव्याप्त गोलन हाइट्सवर इराणी फौजांनी केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हल्ले चढवल्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...