आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Boycott By The Invited Writers Of Beed On The Seminar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संमेलनातील परिसंवादावर बीड येथील निमंत्रित साहित्यिकांनी टाकला बहिष्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - यवतमाळमध्ये ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजित उद््घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याच्या निर्णयाने पुन्हा वादात सापडले. दरम्यान, संमेलनातील परिसंवाद व इतर कार्यक्रमात सहभाग असलेल्या बीड जिल्ह्यातील प्रा. डॉ. गणेश मोहिते व बालाजी सुतार या दोन साहित्यिकांनी बहिष्कार जाहीर केला. तर काहींनी हा प्रकार चुकीचा असला तरी आयोजकांची गैरसोय नको म्हणून सहभागी होणार असल्याचे सांगितले.  प्रेक्षक म्हणून जाणाऱ्या साहित्यप्रेमींनीही नाराजी व्यक्त करत संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला. 


यवतमाळमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंडित नेहरू यांची पुतणी आणि लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. परंतु, सहगल यांच्या उपस्थितीला मनसेने विरोध केल्यानंतर आयोजकांनी सन्मानाने बाेलवलेल्या सहगल यांना पत्र पाठवून उद््घाटक म्हणून निमंत्रण रद्द करत असल्याचे कळवले. दरम्यान, यानंतर  लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा साहित्यिकांनी उचलून धरला आहे. संमेलनादरम्यान विविध कार्यक्रमांत निमंत्रित साहित्यिकांनी बहिष्कार अस्त्र काढले आहे.  बीड शहरातील बलभीम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. गणेश मोहिते हे रविवारी १३ जानेवारी रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रा. शरदचंद्र टाेंगो व्यासपीठावर सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादात निमंत्रित होते. मात्र सहगल यांना डावलल्यामुळे प्रा. मोहिते यांनी बहिष्कार टाकत या परिसंवादात सहभागी होणार नसल्याचे सांगितलेे. 


तर रविवारीच दुसऱ्या सत्रात सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या ‘नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’ या परिसंवादात अंबाजोगाई येथील बालाजी सुतार हे निमंत्रित होते.   एक साहित्यिक बोलतो तेव्हा घाबरून निमंत्रण रद्द होते. येे डर कायम रहना चाहिए. मी निमंत्रित होतो. आता संमेलनाला जाणार नाही. कडेकोट बहिष्कार!’ अशा शब्दांत आपली भूमिका मांडत बहिष्कार जाहीर केला.