आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश अर्थव्यवस्थेला वर्षाखेरीस १८.९ लाख काेटी रुपयांचा फटका शक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाऊस ऑफ काॅमन्समध्ये ब्रेक्झिटच्या पक्षात ३३० मते पडली. - Divya Marathi
हाऊस ऑफ काॅमन्समध्ये ब्रेक्झिटच्या पक्षात ३३० मते पडली.
  • ब्रिटनची वार्षिक वृद्धी ५० टक्क्यांपर्यंत घटली
  • २०१६ पासून आतापर्यंत १२ लाख काेटी रुपयांचे नुकसान

लंडन - ब्रिटनच्या संसदेने अखेर ब्रेक्झिट करारास शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता ब्रिटन ३१ जानेवारी राेजी युराेपीय संघातून बाहेर पडण्याचा मार्ग माेकळा झाला. हाऊस आॅफ काॅमन्समध्ये ब्रेक्झिट कराराच्या बाजूने ३३० व विराेधात २३१ मते पडली. वास्तविक अद्यापही ‘ईयू-यूके विदड्राॅल अॅग्रीमेंट बिल’ हाऊस आॅफ लाॅर्ड््स व युराेपीय संसदेद्वारे मंजुरी मिळणे बाकी आहे. ही केवळ आैपचारिकता आहे. या विधेयकावर तीन दिवस चर्चा झाली. युराेपीय संघातून बाहेर पडल्यानंतर निधी, नागरिकांचे हक्क, उत्तर आयर्लंडसाठी सीमा शुल्क व्यवस्था व बदलासाठी ११ महिन्यांचा हस्तांतरण कालावधी इत्यादी मुद्यांचा त्यात समावेश आहे. 

विराेध सुरूच :


लिबरल डेमाेक्रॅटिक पार्टीच्या एलिस्टर कारमाइकल म्हणाल्या, आमचा पक्ष या धाेकादायक विधेयकाला विराेध करताे. या विधेयकाचे समर्थन करणाऱ्यांनी आगामी पिढ्यांचे जगणे व २७ देशांत काम करण्याच्या अधिकारांना नष्ट करण्यासाठी हे मतदान घेण्यात आले. ब्रिटनची वार्षिक वृद्धी ५० टक्क्यांपर्यंत घटली 

ब्रेक्झिटमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला वर्षाखेरीस सुमारे १८.९ लाख काेटी रुपयांचे नुकसान हाेणार आहे. सध्या नुकसानीचा हा फटका १२ लाख काेटी रुपयांवर पाेहाेचला आहे. ब्लूमबर्ग संशाेधनाच्या मते अलीकडच्या काही वर्षांत आर्थिक वृद्धी घटली.  आणखी वृद्धी ५० टक्क्यांनी घटेल. 
 

ब्रिटन-ईयूची ६०० करारांवर चर्चा


ब्रिटन ईयूसाेबत ६०० आंतरराष्ट्रीय करारांत एकत्र आहेत. हस्तांतरण कालावधी संपताच हे सर्व करारही संपतील. हवामान बदल, मध्य-पूर्वेत शांती इत्यादी मुद्यांवर सहकार्य करण्यासंबंधीचा आराखडा तयार केला जाईल. दहशतवाद, सायबर गुन्हेगार, सुरक्षेसारख्या मुद्यांवर एकत्र येऊन काम करावे लागेल.हस्तांतरण कालावधीत ब्रिटन ईयू सदस्य नाही, नियम पाळणार 


३१ जानेवारीनंतर ११ महिन्यांचा हस्तांतरण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या दरम्यान ब्रिटन युराेपीय संघाचा सदस्य राहणार नसला तरी संघटनेच्या सर्व नियमांचे पालन करेल. एवढेच नव्हे तर बजेटमध्ये याेगदानही करेल. त्यामागे ब्रिटन व युराेपीय संघात भविष्यातील संबंधावर चर्चा होईल. हस्तांतरण कालावधी १ फेब्रुवारीपासून सुरू हाेणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...