आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे : राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती तर काही भागात अतिवृष्टी, महापुराचा फटका यामुळे शेतकरी हवालदिल अाहे. शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत अाहे. शेतकरी संकटात सापडल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकार प्रयत्नशील अाहे. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देताना त्याचा भार राज्याला कितपत झेपावणार अाहे, हे तपासून पाहावे लागेल, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बाेलत हाेते. पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतरच शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय हाेऊ शकेल.
जयंत पाटील व भुजबळांकडील काही खात्यात बदल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे. खातेवाटप झाल्यानंतर सर्वात प्रथम जयंत पाटील यांनीच हे खातेवाटप तात्पुरते असल्याचे ट्विट केले होते. तेव्हा या खातेवाटपावर पाटील नाराज असल्याचे संकेत मिळाले होते.
अजित पवार म्हणाले...
- सध्या मंत्र्यांना दिलेली खाती तात्पुरती. अधिवेशन काळात उत्तरे देण्यासाठी ती उपयाेगी ठरतील.
- तिन्ही पक्षांचे सरकार चालवताना अापसातील वाद टाळले तरच सरकार ५ वर्षे याेग्यरीतीने काम करू शकेल.
- अापल्या पक्षाची सत्ता अाली म्हणून काेणी शिरजाेरी करू नका किंवा कायदाही हातात घेऊ नका.
- काँग्रेस अाणि राष्ट्रवादीची काही खाती नंतरच्या काळात इकडे-तिकडे हाेऊ शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.