आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सशक्त' बनविण्याचा बिझनेस ‘सदाबहार' आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी रात्री डिनर टेबलवर मला माझ्या मुलींच्या मित्रांसमवेत चर्चा करण्याची संधी मिळाली. आमची ही चर्चा उबर इंडियाच्या त्या बातमीने सुरू झाली, ज्यात असे म्हटले होते की, ते आपल्या स्टाफमधील १० ते १५ टक्के कपातीची योजना तयार करत आहेत. अमेरिकेने सोमवारी जे जागतिक कामगार कपात धोरण तयार केले, त्याचा हा भाग होता. भारतात त्यांचा कारभार धोक्यात आहे कारण त्यांना यातून फक्त दोन टक्के कमाई आहे. त्या तुलनेत खर्च जास्त आहे. यात उबर ईट्स ऑनलाइन फूड डिलेव्हेरीचा समावेश आहे. डिनरच्या वेळेस ते सर्वजण मोबाइल पाहण्यात व्यस्त होते म्हणून त्यांच्यासाठी ऑनलाइन फूड डिलेव्हरी हा विषय महत्वाचा असतो. उजव्या हाताने जेवण तर डाव्या हाताने मोबाइलवर स्क्रॉलिंग चालू होते. ही नवी पिढी अशी आहे की, ते बागेत वॉक घेणार नाहीत पण मोबाइलवर शेकडो किलोमीटर स्क्रॉलिंग करतील. आजूबाजूला काय चालले आहे, हे त्यांच्या गावीही नसते. दिवसातून किती जण मोबाइल अपग्रेड करतात, या माझ्या प्रश्नाला  सर्व जणांनी “मी’ असे एका सुरात उत्तर दिले. मी पुढे म्हणालो, “ आता काही मजेशीर आकडेवारी मी तुम्हाला सांगतो. इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशन (आयडीसी) एशिया पॅसिफिकच्या तिमाही मोबाइल फोन ट्रॅकरनुसार २०१९ च्या दुसऱ्या तिमाहीच्या दरम्यान भारतात एकूण ६९.३ कोटी मोबाइल मागविले गेले. हा आकडा मागच्या तिमाहीच्या तुलनेत ७.६ टक्के जादा आहे. अशामध्ये काही ठिकाणी नोकऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत, तर काही ठिकाणी ते काही ठिकाणी कमी होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘फोल्डिंग वंडर’ सारखा मोबाइल खरेदी करण्याची इच्छा करणारे लोक आहेत, ज्याची किंमत १ लाख ६४ हजार ९९९ रूपये आहे आणि हे लोक इकॉनॉमी स्लोडाउनवर वाद घालत आहेत तसेच अशा महागडया वस्तूत गुंतवणूक करण्यासही तयार आहेत.” माझे बोलणे सर्वांना पटले. तरीही त्यांना आणखी काही गोष्टी समजणे गरजेचे आहे, असे मला वाटले. मग मी त्यांना देशातील काही पोलिस स्टेशन्सबाबत सांगितले, ज्यात अहमदाबादच्या वस्त्रापुर ठाण्याचा समावेश आहे. हे ठाणे वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की, मोबाइल चोरीचा अथवा गहाळ होण्याच्या गुन्ह्यांचा फार तत्परतेने तपास केला जातो. पिंकी भगत (४५) यांचेच उदाहरण घ्या. ही एक डबे पोहचविणारी महिला आहे. तिचा दहा हजारांचा मोबाइल हरविला. या मोबाइलमध्ये डबा घेणाऱ्या ग्राहकांची माहिती होती. पण तो मोबाइल सुस्थितीत परत मिळाल्याने तिला आश्चर्याचा पारावर राहिला नाही. हे पोलिस लोक नेमका तपास करतात तरी कसा? वस्त्रापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी हे पाहिले की, लोक मोठया आशेने मोबाइल हरविल्याची तक्रार घेऊन येतात. यासाठी त्यांनी गुन्हे शाखेकडून एक सॉफटवेअर घेतले आणि युवा लोक रक्षक दलाचे काँन्स्टेबल किशन दवे यांच्याकडे हरविलेला मोबाइल शोधण्याची जबाबदारी दिली. २६ वर्षीय दवे यांनी वेगाने हालचाल करून सहा महिन्यात हरविलेले २५ मोबाइल शोधून दिले. या कामाचे बरेच कौतुक होत आहे. फंडा असा : सशक्त बनविणारा उद्योग निवडा. उदा. मोबाइल उद्योग किंवा हरविलेला मोबाइल शोधणे. कारण असा उद्योग मजबूत शस्त्र असेल, ज्याच्या लोक प्रेमात पडतील.  

बातम्या आणखी आहेत...