आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Cable Supplied To The Metro Was Broken; 5,600 Passengers Stranded In Two Railway,

मेट्रोला वीजपुरवठा करणारी केबल तुटली; दाेन रेल्वेत अडकले ५,६०० प्रवासी, ट्रक-ट्रॅक्टरने गेले कार्यालयांत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - दिल्लीत मेट्रोची यलो लाइन मेट्राे मंगळवारी सकाळी तांत्रिक कारणाने नादुरुस्त झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे हजाराे प्रवाशांना आपत्कालीन दरवाजा उघडून बाहेर काढावे लागले. यादरम्यान प्रवाशांनी ट्रॅकवर पायी जवळच्या मार्गाकडे जात कार्यस्थळी जाण्यासाठी ट्रक व ट्रॅक्टरचा अाधार घ्यावा लागला. याबाबत मिळालेल्या छतरपूर मेट्रो स्थानकावर वीजपुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने ट्रेन अचानक थांबली. परिणामी, प्रवासी रेल्वेतच अडकून पडले. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, दुपारी १ वाजता दुरुस्ती झाल्याने रेल्वेसेवा सुरू झाली.  

 

अनेक मार्गांवर मेट्रो रेल्वे ठप्प, तर काही ठिकाणी मंदावली

तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर डीएमआरसीने दोन मार्गांवर मेट्रो रेल्वेसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे समयपूर बादलीहून कुतुबमिनार व सुलतानपूरहून हुडा सिटी सेंटर यादरम्यान रेल्वेसेवा सुरू हाेती. सकाळी गर्दीच्या वेळी अनेक मार्गांवर रेल्वेगाड्यांचा वेळ मंदावला हाेता, तर काही मार्गांवर मेट्रोसेवा पूर्णपणे ठप्प झाली हाेती. छतरपूरहून कुतुबमिनारदरम्यान एक रेल्वे दीड तासाहून जास्त वेळ अडकून पडली. त्यामुळे रेल्वेमध्ये काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने सर्व दरवाजे खाेलले गेले. त्यानंतर प्रवासी रुळांजवळ  बनवलेल्या लहान फुटपाथवरून कार्यस्थळी गेले. मेट्रो सेवा ठप्प झाल्याचा फायदा उचलून ओला व उबेरचालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतले. त्यामुळे अनेक जणांनी ट्रक, ट्रॅक्टर व रिक्षांचा आधार घेतला.