आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Call Center Will Provide Players With Feedback, From Training To Diet; Prepare The Payments On This Basis

स्टेडियममध्ये कॉल सेंटर, ट्रेनिंगपासून डाएटपर्यंतचा फीडबॅक खेळाडू देणार; या आधारावर याेजना तयार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉल सेंटरशिवाय आता मंत्रालयाच्या वतीने वेब अॅप्लिकेशनचीही सुरुवात
  • २०२८ : टॉप-१० ऑलिम्पिक पदक विजेत्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य निश्चित
  • २०२४-२०२८ ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात

​​​​​नवी दिल्ली : भारताते आता क्रीडा विश्वातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील आपल्या पदकांचा टक्का वाढवण्यासाठी माेठा निर्णय घेतला आहे. याच्याच आधारावर आता या स्पर्धेत पदक विजेत्यांमध्ये भारतीय खेळाडूंची संख्या वाढवण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. यासाठी २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक आणि २०२८ च्या लाॅस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल कामगिरीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. या दाेन्ही स्पर्धांच्या तयारीलाही सध्या भारतामध्ये सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी दाेन माेठे निर्णय घेण्यात आले आहेत.


केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दाेन महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. यामधील पहिले म्हणजे खेळाशी संबंधित असलेल्या सर्वच गाेष्टींमध्ये सकारात्मक असा माेठा बदल आणि विकास घडवणे. यासाठी खेळाडूंकडूनच थेट फीडबॅक मागवून घेणे. त्यानंतर या फीडबॅकचा सर्वताेपरी सखाेल अभ्यास करणे आणि त्याच्या आधारावर याेजना तयार करण्याचा निर्णय घेणे, याच समीकरणाच्या आधारावर अाता केंद्रीय क्रीडा मंत्रालय काम करत आहे. याच्या आधारे याेजनाही घाेषित हाेतील.

काॅल सेंटरचे काम वेगात :
खेळाडूंनी थेट आपला फीडबॅक द्यावा, यासाठी स्टेडियममध्येच काॅल सेंटर सुरू करण्याची माेहीम हाती घेण्यात आली. यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये कॉल सेंटर तयार करण्यात आले आहे. याचे काम वेगात सुरू आहे, या कामावर सध्या केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू नजर ठेवून आहेत. या काॅल सेंटरमधील सदस्य राेज देशभरातील साईच्या केंद्रातील खेळाडूंशी संपर्क साधतात आणि त्यांचा फीडबॅक घेण्याचे काम करत आहेत.

खेळाडूंचा डाटा जमा करण्याची प्रक्रिया
कॉल सेंटरशिवाय आता मंत्रालयाच्या वतीने वेब अॅप्लिकेशनचीही सुरुवात करण्यात आली आहे. याच्या आधारावर सेंटरवर अभ्यास करणाऱ्या खेळाडूंचा डाटा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने हाेत आहे. कॉल सेंटरमध्ये खेळाडूंनी केलेल्या तक्रारीवरही तत्काळ उपाययाेजनाही आखली जाईल. तक्रार मिळताच तत्काळ त्या सेंटरच्या इन्चार्जला पाठवण्यात येईल. यातून संबंधित खेळाडूंच्या अडअडचणी २४ तासांत दूर करण्यास पसंती दिली जाणार आहे..
 

बातम्या आणखी आहेत...