आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Cannes Film Festival Is Also Seems To Be To Be Cancelled Due To Corona Virus

कान्स फिल्म फेस्टिव्हलदेखील रद्द होण्याची शक्यता, 12 मेपासून फ्रांसमध्ये होणार होते आयोजित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी कोरोना व्हायरस (कोव्हिड-19) ला महामारी घोषित केले आहे. चीनच्या वुहानमध्ये डिसेंबरमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरस समोर आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 120 देशांमध्ये 4300 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि एक लाख 19 हजारपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या जाळ्यातून सिनेमादेखील सुटलेला नाही. अनेक चित्रपटांचे शूटिंग शूटिंग पोस्टपोन होत आहे तर अनेक फेस्टिव्हल रद्द होत आहेत. दरवर्षी आयोजित होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलवरदेखील कोरोनामुळे रद्द होण्याचे संकट घोंगावत आहे. 

कान्स होऊ शकते रद्द... 

फेस्टिव्हलचे प्रेसिडेंट पियरे लेस्क्योरने फ्रेंच न्यूजपेपर ली फिगारो यांच्याशी बातचितीमध्ये सांगितले. आम्ही ही अपेक्षा करत आहोत की, कोरोना व्हायरस मार्चच्या शेवटपर्यँत नियंत्रणात येईल आणि एप्रिलमध्ये आम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकू. पण मनात याबद्दल शंका आहे त्यामुळे जर परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही हे रद्द करू. यावर्षी हे फेस्टिव्हल 12 मेला होणार होते आणि 16 एप्रिलला याचे लाइन-अप अनाउंस होणार होते. पण लेस्क्युरने पुढे सांगितले की, हे फेस्टिव्हल कोणत्याही इंश्युरन्स पॉलिसीच्या अंतर्गत इन्श्यूअर्ड नाहीये त्यामुळे हे रद्द कारण्याव्यतिक्त कोणताही पर्याय नाहीये. 
 

बातम्या आणखी आहेत...