आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीवरील कालव्यांची वहनक्षमता धिम्या गतीची, तरी दरवर्षी काेट्यवधींचा खर्च

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पैठण - जायकवाडी धरणाची निर्मिती ही मराठवाड्यातील सिंचन डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याने धरणावर डावा व उजव्या कालवा तयार करण्यात आला. मात्र, आता या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था झाली असून वहनक्षमता निम्म्यावर आली असली तरी दरवर्षी कालव्यावर काेट्यवधींचा खर्च का, असा सवाल शेतकऱ्यांना पडला अाहे.  यातच कालव्यालगतच्या शेतीला ठिबक व बंद कालव्याद्वारे पाणी हा विषय पाठपुराव्याअभावी अडकला असल्याने आता कालव्याची वहनक्षमता धिम्या गतीची आहे.जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यतील पावणेदोन लाख हेक्टर शेती ओलिताखाली येत असली तरी, जायकवाडीच्या दोन्ही कालव्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात अाहे. सिंचन क्षेत्र जास्त ओलिताखाली येत नसल्याची बाब समोर आल्याने राज्य सरकारने यापुढे बंद पाइपलाइनद्वारे सिंचनाला पाणी देण्यात येणार असल्याचे नियोजन केले होते. हा विषय मागे पडला असताना कालव्याच्या दुरुस्तीवर कोटींचा खर्च करण्यात येत आहे. तरीही वहनक्षमतेत विशेष वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे.
जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर औरंगाबाद, जालना, परभणी, नगर, बीड जिल्ह्यातील शेती पाण्याखाली येते. यात दरवर्षी धरणाचा पाणीसाठा ३३ टक्क्यांपुढे असेल तर पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र, यात धरण शंभर टक्के भरले व त्यात शेतीला आठ ते नऊ पाणी पाळी दिल्या जातात. आता ही पाणी पाळी देण्याची तयारी सुरू असतानाच कालव्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. यात दरवर्षी काही ठिकाणचीच दुरुस्ती त्यात इतर ठिकाणीची टप्प्याटप्प्याने  केली जाते. मात्र दुसरी दुरुस्ती हाती घेण्यापूर्वीच अगोदरची दुरुस्ती केलेलीदेखील खराब होते अाहे. यात पाणी सोडले तरी जास्त पाणी वाया जात असल्याची बाब समोर आली अाहे. कालव्याची वहनक्षमता कमी झाली असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दोन्ही कालवे पूर्ण खराब 

जायकवाडीवर डावा व उजवा हे दोन कालवे असून दोन्हींची अवस्था बिकट झाली आहे. या कालव्यासंदर्भात दिव्य मराठीने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही प्रमाणात कालव्याची दुरुस्ती करण्यात आली व ती दरवर्षी करण्यात येते. यावर एक ते दोन कोटींच्या वर खर्च होतो तरी वहनक्षमता मात्र वाढताना दिसत नाही.

कालव्याचा विषय

डावा कालवा हा २०८ किमी लांबीचा असून त्याची वहनक्षमता १००.०८ घ.मी प्रति सेकंद आहे. या कालव्यावर औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील १४१६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते.उजवा कालवा :


उजवा कालवा हा १३२ किमी लांबीचा असून त्याची वहनक्षमता ६३.७१ घमी प्रतिसेकंद आहे. यावर नगर, औरंगाबाद, बीड जिल्ह्यातील ४६६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. यात शेवटच्या टोकापर्यंत कमी पाणी पोहोचले जाते. त्यामुळे पाणी सोडताना जास्त वेगाने पाणी सोडले जाते. यात पाणी वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...