Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | The car accident after the driver's control, the couple died

चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली, दांपत्य ठार

प्रतिनिधी | Update - May 17, 2019, 09:13 AM IST

बीड-नगर मार्गावरील अंमळनेरजवळ अपघात

  • The car accident after the driver's control, the couple died

    अंमळेनर- नांदेडहून पुण्याला निघालेल्या कारच्या चालकाचा ताबा सुटून कार उलटल्याने कारमधील पांडूरंग दासराव पांडे व उदया पांडुरंग पांडे (रा. नांदेड) या पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले. बीड-नगर मार्गावरील अंमळनेरजवळ दौलतवाडी भागात गुरुवारी दुपारी दोन वाजता हा अपघात झाला. पांडूरंग पांडे हे नांदेडच्या सा. बां. विभागातील निवृत्त कनिष्ठ अभियंता आहेत.


    पांडे दांपत्य मुलगा श्रेयस पांडे, चुलत भाऊ व इतर दाेघांसह नांदेडहून गुरुवारी सकाळी कारने पुण्याला निघाले होते. श्रेयस कार चालवत हाेता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली जाऊन चार वेळा उलटली. मुलगा श्रेयस हा किरकोळ जखमी आहे. उर्वरित तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातांनतर दौलतवाडी ग्रामस्थांनी डोंगरकिन्ही येथून रुग्णवाहिका बोलावून जखमींना बीडला हलवले. याच वेळी नगर येथून बीडकडे निघालेल्या एका रुग्णवाहिकेतून पांडे दांपत्याचे मृतदेह अंमळेनर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

Trending