आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार झाडावर धडकली; साले-मेहुणे ठार, 1 गंभीर: फुलंब्रीमधील डोंगरगाव कवाड शिवारातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - पाल फाट्यावर जेवण करून घरी जाताना डोंगरगाव कवाड शिवारातील एका बाभळीच्या झाडाला इंडिका कार धडकून साले-मेहुणे ठार, तर चुलत भाऊ गंभीर झाला. ही घटना  गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास   घडली.  एकाच कुटुंबातील जावई-मुलगा या घटनेत ठार झाले आहेत.  

 
सुनील विनायक काकडे (३४, रा. अयोध्यानगर, एन-७ औरंगाबाद) व जगन्नाथ फकीरबा बोडखे (३८, रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) हे साले-मेहुणे अपघातात ठार झाले, तर चुलत भाऊ भीमराव उत्तमराव बोडखे (३६, रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) हे गंभीर जखमी झाले.   
 दिवाळी-भाऊबिजेनिमित्त माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी सुनील काकडे हे डोंगरगाव कवाड येथे गेले होते. दरम्यान, रात्री उशीर झाल्याने उद्या सकाळी जा, असे सासुरवाडीत सांगितल्याने ते थांबले व जगन्नाथ बोडखे, त्यांचा चुलत भाऊ भीमराव बोडखे यांच्यासह पाल फाट्यावर जेवण करण्यासाठी गेले. पाल फाट्यावर रात्री दोघंानी  जेवण करून रात्री १ वाजेच्या सुमारास डोंगरगाव कवाड येथे घरी इंडिका कार (एमएच २० डीएम ९०७६) ने जात होते. दरम्यान, एका बाभळीच्या झाडाला कार जोरात धडकली.

 

ही धडक इतकी भीषण होती की, यात इंडिका कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इंडिका कारमधील साले-मेहुणे गंभीर जखमी झाले.    पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, आर. एन. छत्रे, शेख इलियास यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सुनील काकडे व जगन्नाथ बोडखे यांना तपासून मृत घोषित केले, तर भीमराव बोडखे हे जखमी झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...