आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - बजरंग बाेगद्यालगतच्या समांतर बाेगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून नेताना माजी प्राचार्यांची गाडी अर्धा पाऊणतास अडकून पडली हाेती. दरम्यान, या कामाच्या मक्तेदारांच्या मजुरांनी व नागरिकांनी दाेरीच्या मदतीने ही कार माेठ्या कष्टांनी बाहेर काढली.
बजरंग बाेगद्यालगत असलेल्या नवीन समांतर बाेगद्यातून शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एका तरुणाने घाेडा नेला. त्याअगाेदर काही तरुण दुचाकीने बाेगद्यातून गेले हाेते. त्यांच्या पाठोपाठ नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अजित वाघ हे अापल्या कार (एमएच १९, क्यू ५५६५)ने पिंप्राळा परिसरातून गणेश काॅलनीकडे येत हाेते. त्यांनी समांतर बाेगद्यातून कार नेण्यासाठी नवीन बाेगद्याच्या मार्गाने वळवली. परंतु, अर्धा बाेगदा पार झाल्यानंतर कारच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने कार मध्येच बंद पडली. त्यानंतर मात्र कार सुरु झाली नाही. त्यांनी कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता बाेगद्यात साचलेले पाणी कारमध्ये अाले. त्यानंतर माेठी कसरत करुन ते कारमधून बाहेर पडले. प्राचार्य वाघ कारचे दार बंद करून पाण्यातून बाहेर अाले. त्यावेळी उपस्थित रेल्वे मक्तेदाराचे मजुर व परिसरातील नागरिकांनी कारच्या बाेनेटला नायलाॅनचा दाेर बांधून बाेगद्याबाहेर लावलेल्या अाेव्हर हेड बारच्या वर टाकून कार अाेढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कारच्या फ्रंट सीटच्या दाेन्ही काचा खाली करून त्यातून दाेर टाकून कार बाहेर काढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.