आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Car Was Taken Directly Goes In The River, Two Friends Are Dead On The Spot In The Nashik, Car Has Taken Out Of The River On Saturday Morning

कार थेट नदीपात्रात, दोन मित्र जागीच ठार, अपघातग्रस्त कार शनिवारी सकाळी नदीतून बाहेर काढण्यात आली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : भरधाव वेगात जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालकासह एक जण जागीच ठार झाला. तर चौघे जखमी झाले. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास नाशिकच्या आसाराम बापू पुलावर हा भीषण अपघात घडला. गाडीचा वेग इतका होता की गाडी दुभाजकावरून उडून थेट नदी पात्रात जाऊन कोसळली. चौघांना परिसरातील नागरिकांसह अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले. कल्पेश प्रभाकर मेश्राम, भूषण मुरलीधर तिजारे (दोघांचे वय २८) अशी मृतांचे नावे अाहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश प्रभाकर मेश्राम, भूषण मुरलीधर तिजारे, अाणि त्यांचे चौघे मित्र अभिजीत शेंडे, अक्षय निखारे, रोहित डोहिफोडे, राकेश शाहू हे मित्र होंडा सिटी कारने रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास म्हसरूळकडून आसाराम बापू पुल मार्गे गंगापूर रोडकडे येत असताना कार चालक कल्पेश मेश्राम याचे कार वरील नियंत्रण सुटले. कार वेगात असल्याने कार पुलावरील दुभाजकावरून कार उडून थेट गोदावरी नदीपात्रात जाऊन कोसळली. कल्पेश अाणि त्याच्या शेजारी बसलेला भूषण तिजारे यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. पाठीमागे बसलेल्या मित्रांपैकी एकाने पाण्यातून बाहेर येऊन मदतीसाठी अारडाअोरड केली. रस्त्यावरील जाणाऱ्या वाहन चालकांनी अग्निशामक दल पोलिसांनी कळवले. काही वेळात अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बंबाच्या जवानांनी रात्रीच पाण्यात उतरून चौघांना बाहेर काढले.