आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला | नातेवाईकाच्या सोयरिक संबंधासाठी कारने जात असताना कार पुलावरून खाली कोसळली. त्यात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी व दोन नातेवाईक गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता सुकळी फाट्यासमोर घडली. विशेष म्हणजे चेतन आणि प्राजक्ता यांचा १८ मे २०१९ रोजी विवाह झाला होता. चेतन दिनकराव झामरे (वय २७) रा.रोहनखेड असे मृतकाचे नाव आहे. चेतन आणि पत्नी प्राजक्ता हे दोघे निखिल त्याची बहीण व मावसभाऊ कारने (एमएच ३० एझेड ७४९२) कुटासा येथून दहीहंडा मार्गे दर्यापूरकडे कुठं येथील डॉक्टर विजय झटाले यांचे चिरंजीव निखिल यांचा साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी अंजनगाव येथे जात होते. सुकोडा फाट्यानजीक ताबा सुटल्याने गाडी पुलाखाली कोसळली आणि यामध्ये चेतन यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. चेतन हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता कपिल ढोके यांचे बहीण जावई होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.