National Special / 41 वर्षांनंतर संपला 20 रुपयांच्या चोरीचा खटला, 1978 मध्ये केला होता आरोप


2004 पासून तारखेवर जाणे बंद केले, 18 एप्रिलला पोलिसांनी अटक केले
 

दिव्य मराठी वेब

Jul 15,2019 03:52:51 PM IST

ग्वाल्हेर(मध्यप्रदेश)- 41 वर्षांपासून 20 रुपयांच्या चोरीचा खटला शनिवारी नॅशनल लोक न्यायालयात संपला. खरतर, इस्माइल खानवर 1978 मध्ये 20 रुपये चोरल्याचा आरोप होता. जिल्हा कोर्टात 41 वर्षांपासून त्याची ट्रायल लांबणीवर पडली होती. कोर्टात उपस्थित न राहिल्यामुळे एप्रिलमध्ये त्यांना अटक करण्यात आले. त्याचा जामीन देणारा कोणीच नव्हता, त्यामुळे त्याला चार महिने तुरुंगात राहावे लागले.

लोक न्यायालयाने शनिवारी फिरयादीला बोलवाले. कोर्ट म्हटले- "प्रकरण 41 वर्षे जुने आहे. आरोपीदेखील चार महिने तुरुंगात राहीला आहे. या खटल्याला चालवण्यात आता काही उपयोग नाही." सुनावनी दरम्यान 64 वर्षीय फिरयादी बाबूलाल म्हणाला- " मी आरोपीला ओळखत नाही. इतके वर्षे झाले आहेत, आता प्रकरण मिटवून टाका," यावेळी फिरयादीच्या सम्मतीने खटला संपवण्यात आला.


बसमध्ये झाली होती चोरी
सायंस कॉलेजमध्ये लॅब वर्कमॅनम्हणून कार्यरत असलेल्या बाबूलालने सांगितले की, 1978 मध्ये बसमध्ये तिकीट खरेदी करत होते, तेव्हा त्यांच्या खिशातून 20 रुपये चोरी झाले होते. माधौगंज पोलिसांनी तपासानंतर इस्माइल खानला आरोपी बनवले होते. इस्माइलने 2004 पासून तारखेवर जाणे बंद केले. त्यामुळे 18 एप्रिलला त्यांना अटक करून तुरुंगात टाकले.

X
COMMENT