आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Case Of Hyderabad Rape Victim Will Proceeding In Fast Track Court; After 4 Days CM Announces

अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालणार; 4 दिवसांनंतर सीएमची घाेषणा, आराेपीची आई म्हणाली - फाशीवर लटकवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी न्यायालयीन कोठडीत, पोलिस कोठडीसाठी न्यायालयात याचिका दाखल हाेणार
  • हैदराबादमधील अत्याचाराने देशाची राजधानीही हळहळली...
  • मेकॅनिककडे मिळाले धागेदाेरे

हैदराबाद / नवी दिल्ली : हैदराबादमध्ये महिला व्हेटर्नरी डाॅक्टरवरील अत्याचार व हत्येचा खटला आता जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घटनेच्या चार दिवसांनंतर रविवारी याबाबतचे आदेश दिले. राव म्हणाले, ही घटना अतिशय भयंकर आहे. पाेलिसांनी दाेषींना कडक शिक्षा मिळवून द्यावी. सरकार पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वताेपरी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. आराेपींना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली जाईल. त्यामुळे पाेलिस काेठडीत आराेपींची चाैकशी करता येईल, असे पाेलिसांनी सांगितले. तत्पूर्वी कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी चारही आराेपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत पाठवले. पाेलिस सूत्रांच्या मते, एका टायर मेकॅनिकच्या मदतीने आराेपींपर्यंत पाेहाेचता येऊ शकले, असे पाेलिसांनी सांगितले. पीडितेची गाडी खराब झाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी परिसरातील टायर मेकॅनिकचा शाेध घेतला. एका मेकॅनिकने काेणीतरी पंक्चर टायरमध्ये हवा भरण्यासाठी लाल रंगाची बाईक घेऊन आले हाेते, अशी माहिती दिली. आराेपी उलट्या दिशेने बाईक आणत हाेते,.पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात दाेन आराेपी स्कूटरसह दिसून आले. एक ट्रक ६-७ तास रस्त्यावर उभा हाेता. स्क्रीनशाॅटने ट्रकचा नाेंदणी क्रमांक मिळाला. त्यानंतर पाेलिस ट्रक मालकापर्यंत पाेहाेचले. नंतर आराेपीचे नाव समजले.

भागवत म्हणाले - महिलांना घरातूनच सन्मान मिळायला हवा; फाशी द्या : इमाम प्रमुख

दिल्लीत गीता महाेत्सवात सरसंघचालक माेहन भागवत म्हणाले, मातृशक्तीचे सदैव संरक्षण व्हायला हवे. सरकारने कायदा बनवला आहे. कायद्याचे नीटपणे पालन व्हायला हवे. शासन-प्रशासनाचे वागणे याेग्य नाही. पण, आपणही त्यांच्यावर सर्व गाेष्टी साेडणे याेग्य नाही. गुन्हे करणाऱ्यांनाही आई-बहिणी आहेत. त्यांच्यामुळेच याचे अस्तित्व आहे. त्यांना काेणीही शिकवलेले नाही. खरे तर घरातूनच सुधारणेला सुरुवात व्हायला हवी. दुसऱ्यांच्या मातृशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकाेन शुद्ध व स्वच्छ असला पाहिजे. याच कार्यक्रमात उमेर अहमद इलियासी यांनी हैदराबाद प्रकरणात संताप व्यक्त केला. अत्याचार करणाऱ्यांना जनतेमध्ये फासावर लटकावले पाहिजे.

आग्रा : अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला, राजस्थानात विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर हत्या

उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात खाकेगड गावात एका मुलीचा गळा कापलेला मृतदेह सापडला. पीडिता घराजवळ शाैचासाठी शेतात गेली हाेती. परंतु, शेतात परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शाेध घेतला, असे पाेलिसांनी सांगितले. एका सरकारी शाळेजवळ सुनसान जागी तिचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला हाेता. घटनास्थळी तिचा माेबाइलही सापडला.

राजस्थानात टाेंक जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर तिच्या हत्येचे प्रकरण समाेर आले आहे. सहा वर्षांची मुलगी शाळेतून घरी न परतल्यामुळे कुटुंब तिला शाेधायला िनघाले. तेव्हा तिचे कलेवर खेडली गावातील जंगलात सापडले. अत्याचारानंतर मुलीची गळा दाबून हत्या केली. आराेपी फरार .

आराेपीची आई म्हणाली - फाशीवर लटकवा

आराेपी सी. चेन्नाकेशवुलची आई म्हणाली, माझ्या मुलास मुळीच नरमाई दाखवू नका. भलेही त्याला जिवंत जाळा. त्याने पीडिताला जाळले हाेते. आमचीही एक मुलगी आहे. या नात्याने पीडितेच्या कुटुंबीयांच्या वेदना आम्ही नक्कीच समजू शकताे. मुलाला काय शिक्षा मिळावी, असा प्रश्न मीडियाने आराेपीच्या आईला विचारला हाेता.
 
छायाचित्र दिल्लीचे आहे. हैदराबादमधील अत्याचाराच्या विराेधात मुली रस्त्यावर उतरल्या हाेत्या.
 

बातम्या आणखी आहेत...