आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारानंतर महिला गरोदर, प्रकरण दडपण्यासाठी सहायक पोलिस उपनिरीक्षकाने आरोपीच्या वडिलांकडून घेतली होती लाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांना दिलेली लेखी तक्रार तपासासाठी सहायक पोलिस उपनिरीक्षक भागुजी पांढरे यांच्याकडे आली. यात पांढरे याने आरोपीच्या वडिलाला बोलावून तुमच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार आली, असे सांगून संबंधितांकडून अॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये स्वीकारण्याने एसीबीच्या जाळ्यात गुरुवारी हा अधिकारी अडकला. दरम्यान, या प्रकरणात एका तरुणाने पीडित महिलेवर विविध लॉजसह जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या झुडपात बलात्कार केला. नंतर ही महिला गरोदर राहिल्याने त्या युवकाने लग्नास नकार दिल्याने पीडितेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पंकज आसाराम खाडे (२३, मातोश्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड रोड, जालना) असे आरोपीचे नाव आहे.पीडित महिला व आरोपी पंकज खाडे हे अंबड रोडवरील सूतगिरणीमध्ये कामाला होते. त्या महिलेच्या पतीने दुसरी पत्नी केल्यामुळे ती एकटीच राहते. दरम्यान, अंबड रोडवरील असलेल्या एकाच सूतगिरणीत दोघेजण कामाला असल्यामुळे दोघांमध्ये आेळख झाली. ओळखीतून एकमेकांच्या सर्व माहिती झाली. यात ही महिला एकटीच असल्याचे लक्षात येताच पंकज खाडे याने तिला विश्वासात घेऊन तिला अनेकदा लॉजवर नेले. दरम्यान, काही दिवसापूर्वी शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या झाडा-झुडपांच्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. यानंतर ही महिला गरोदर राहिली. यामुळे त्या महिलेने त्याच्याशी लग्न करण्यासाठी हट्ट धरला.

 

परंतु, पंकज हा लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता. दरम्यान, आता दोन दिवसांपासून तर फोनच उचलत नसल्यामुळे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय शेजूळ हे करत आहेत.

 

घटनास्थळाचा पंचनामा
कदीम पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पुढील तपासात या बाबी समोर येईल, असे पीएसआय शेजूळ यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...