• Home
  • The case of the death of a child suffering from cancer in America

अमेरिका / कॅन्सर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी सैन्याकडे केली विनंती, मुलाच्या अंत्यसंस्कारात अशाप्रकारे हजेरी लावा

मुलगा नेहमीच टॉय गनसोबत खेळत असे, त्याची खेळणी देखील सैनिकी शस्त्रास्त्रांसारखी होती
 

दिव्य मराठी वेब

Jun 27,2019 01:42:04 PM IST

अरकंसास - अमेरिकेच्या अरकंसास येथील 5 वर्षीय ओक्ले निम्मोचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अंत्यसंस्कारात अमेरिकी सैनिकांना गणवेशात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

ओक्ले नेहमीच टॉय गनसोबत खेळत होता आणि त्याची खेळणी देखील सैनिकी शस्त्रांसारखी होती. त्याला मोठे होऊन सैन्यात भरती व्हायचे होते. त्याची हीच गोष्ट लक्षात घेत कुटुंबीयांनी अमेरिकी सैन्याला विनंती केली आहे. ओक्लेला 2015 मध्ये न्यूरोब्लास्टोमा आजार झाल्याचे समजले होते. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

कुटुंबीय म्हणाले - त्याने जिद्दीने कॅन्सरशी मुकाबला केला

जून 2017 मध्ये ओक्लेचा आजार पूर्णपण बरा झाला होता. पण एका महिन्याने कॅन्सरने त्याला ग्रासल्याचे माहीत झाले. यावर्षी फेब्रुवारीत कॅन्सर त्याच्या शरीराच्या मोठ्या भागात पसरला होता. यामुळे 15 जून रोजी त्याच्या लीव्हरने काम करणे बंद केले होते. ओक्लेने अगदी जिद्दीने कॅन्सरचा सामना केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

X
COMMENT