आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपात पाहणाऱ्यांना महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 'महाराष्ट्राने आतापर्यंत देशाचे नेतृत्व केले. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मात्र महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात सडत आहे. जातीवर उमेदवार ठरवले जात आहेत. तुम्हाला कोणी विचारात घेत नाही, गृहीत ठरले जात आहे. सत्ता डोक्यात गेल्यानंतर असे घडते,' अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी व विराेधी पक्षांवर टीका केली. कोथरूड मतदासंघामध्ये मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. राज ठाकरे म्हणाले, 'भाजपला पुण्यात कोल्हापूरमधून उमेदवार आणावा लागत आहे. जातीपातीचे गणित डोक्यात ठेवून उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले. त्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. या लोकांना महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश आणि बिहार करायचा आहे का?' असा प्रश्न ठाकरे यांनी केला. राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडणाऱ्यांना गडकरी कोण होते हे माहीत आहे का? आज राज्यात नेते, साहित्यिक, कलावंतांनासुद्धा जातीपातीच्या राजकारणात ओढले जाते,' अशी खंत राज यांनी व्यक्त केली. डाॅ. मनमोहनसिंग हे अर्थतज्ञ आहेत. जगभर त्यांची ख्याती आहे. आपल्या देशात मंदी येणार हे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांचे म्हणणे कोणीच गांभीर्याने घेतले नाही. आता मंदीला सुरुवात झाली आहे. त्यांचे म्हणणे खरे हाेत अाहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे, असे राज म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...