‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावर / ‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावर अाता वाटप होईल परीक्षेचे केंद्र

​दिव्य मराठी नेटवर्क

Nov 10,2018 10:24:00 AM IST

कोटा - नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे आयोजित होणाऱ्या ‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावरच केंद्रांचे वाटप केले जाईल. नीटतर्फे जारी एफएक्यूत हा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. म्हणजेच जर एखादा मुलगा गुजराती भाषेत पेपर देऊ इच्छित असेल तर त्याला गुजरातमध्येच केंद्र वाटप केले जाईल. बंगाली भाषेत परीक्षा देणाऱ्यांना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात केंद्र दिले जाऊ शकते, असे एफएक्यूत सांगण्यात आले आहे.

या दोन राज्यांत बंगाली भाषा बोलली जाते. कन्नड भाषेत परीक्षा देणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत दिल्ली किंवा इतर राज्यांत केंद्र दिले जाणार नाही. दुसरीकडे, प्रादेशिक भाषांत पेपर देणारी राज्ये कोट्यासाठीही पात्र असतील, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. २०१९ या वर्षात आयोजित होणाऱ्या नीटमध्ये ११ भाषांत पेपर असेल. प्रादेशिक भाषांत पेपर देणाऱ्यांना संबंधित राज्य मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेही निश्चित करण्यात येईल की, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पेपर देणाऱ्यांना कोणतेही राज्य आणि परीक्षा केंद्र वाटप केले जाऊ शकते.
रिचेकिंग नाही, पण आन्सर-कीला आव्हान देऊ शकतील विद्यार्थी : या वर्षी नीटमध्येही रिचेकिंगची तरतूद ठेवण्यात आलेली नाही, पण विद्यार्थी आन्सर-की जारी झाल्यानंतर तिला आव्हान देऊ शकतील. त्यासाठी प्रतिप्रश्न एक हजार रुपये एवढे शुल्क लागेल. त्यानंतर एक समिती विद्यार्थ्यांच्या आव्हानावर विचार करेल. आव्हान योग्य असेल तरच बोनस गुण देण्यात येतील.


पेपरचा स्तर एकसारखा ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान

एनटीए पहिल्यांदाच नीटचे आयोजन करत आहे. याआधी सीबीएसई ही परीक्षा घेत होती. गेल्या वर्षीही विविध भाषांत परीक्षा झाली होती. परीक्षेच्या इंग्रजीचा स्तर प्रादेशिक भाषांपेक्षा सोपा असल्याचे आरोपही झाले होते. त्यामुळे सीबीएसईवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एवढेच नाही तर हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. सर्व ११ भाषांतील पेपरचा स्तर एकसारखा ठेवणे हे एनटीएसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. विद्यार्थ्यांनाही हे बदल कितपत चांगले वाटले याचा आढावा घेतला जाईल.

X
COMMENT