आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 सप्टेंबरला धनु राशीमध्ये शनी बदलणार चाल, सर्व 12 राशींवर पडेल थेट प्रभाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 18 सप्टेंबर रोजी ग्रहांचा न्यायाधीश शनी आपली चाल बदलेल. हा ग्रह सध्या धनु राशीमध्ये वक्री आहे. 18 तारखेनंतर हा ग्रह मार्गी होईल म्हणजेच सरळ चालेल. शनी 30 एप्रिल 2019 पासून वक्री होता. धनु राशीच्या स्वामी गुरु ग्रह आहे. सध्या धनु राशीमध्ये केतू ग्रहसुद्धा स्थित आहे.

राहू-केतू व्यतिरिक्त सर्व ग्रह राहतील मार्गी
शनी मार्गी झाल्यानंतर फक्त राहू-केतू वक्री राहतील कारण हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री राहतात. शनी मार्गी झाल्यामुळे बाजारात आलेली मंदी समाप्त होण्याचे योग जुळून येतील. नैसर्गिक संकटे कमी होतील. बाजारात आर्थिक स्थिती सुधारेल. शेतीमध्ये पीक चांगले येईल. विशेषतः मेष आणि सिंह राशीच्या लोकांसाठी ही स्थिती चांगली राहील.

या राशींसाठी शनी राहील फायदेशीर 
धनु राशीमध्ये शनी मार्गी झाल्यामुळे मेष, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. मागील काही काळापासून चालू असलेल्या अडचणी समाप्त होतील. मान-सन्मान वाढेल. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

या राशीच्या लोकांनी राहावे सावध
शनीने चाल बदलल्यामुळे वृषभ, मिथुन, कन्या, धनु आणि मकर राशीच्या लोकांनी सावध राहावे. या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. जास्त कष्ट करावे लागतील, परंतु मनासारखे यश प्राप्त होणार नाही. घर-कुटुंबातील अशांती वाढू शकते. या लोकांनी शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक शनिवारी तेलाचे दान करावे. हनुमान चालीसाचा पाठ करावा.

बातम्या आणखी आहेत...