आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देऊन डावलले; आमदार गोटेंचा स्वतंत्र पक्ष: पालिका निवडणुकीत उभे केले 74 उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भाजप महापालिका निवडणुकीचे सूत्र आपल्या हाती देत नसल्याच्या कारणावरून नाराज व पक्षाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊ केल्याने बंडांचा झेंडा उगारणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी नाट्यमयरीत्या नवीन पक्षाची घोषणा केली. शिवाय, या पक्षाकडून धुळे महापालिका निवडणुकीत सर्व ७४ जागांवर उमेदवार उभे करून भाजपलाच खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अाता ही निवडणूक चांगलीच चुरशीची हाेणार अाहे.


धुलष महापालिकेची निवडणूक अामदार गाेटेंच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे अाश्वासन मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिले होते. मात्र, त्यानंतर ४८ तासांतच भाजपने गाेटेंना पुरते एकाकी पाडले. मंगळवारी सकाळी भाजप महानगराध्यक्षांनी अाणलेल्या उमेदवारांच्या यादीतील २८ जण गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याचे अामदार अनिल गाेटे यांनी त्यांची नावे खाेडून टाकली. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत भाजपकडून चर्चेसाठी बाेलावण्याची वाटही पाहिली. परंतु, भाजपने डावलल्याचे दिसताच गाेटे यांनी अापलाच जुना पक्ष ‘लाेकसंग्राम’चे हत्यार पुढे केले.

 

त्याच वेळी स्वतंत्रपणे “स्वाभिमानी भाजप लाेकसंग्राम’ पक्षाची घाेषणा केली. या झेंड्याखाली निवडणूक लढवू, असे त्यांनी सांगितले. महापाैरपदासाठी त्यांच्या पत्नी हेमा गाेटे यांचे नाव पुढे केले. भाजपसह राष्ट्रवादीविरुद्ध अापली लढाई असेल. गुन्हेगारीमुक्तीच्या घाेषणेवर अापण निवडणूक लढवू, असेही त्यांनी सांगितले.  त्याच वेळी अायुक्तांना पत्र देऊन त्यांनी शिट्टी हे चिन्ह देण्याची मागणीही केली.  


उमेदवारांना लाेकसंग्रामचे पत्र : गाेटे यांनी सगळ्या प्रभागांमधील ७४ जागांवर उमेदवार दिले. या सगळ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले तेव्हा त्यांना लाेकसंग्राम या अनिल गाेटे यांच्या यापूर्वीच्या पक्षाचे पत्र देण्यात अालेे. स्वाभिमानी भाजपची घाेेषणा करताना गाेटे यांना लाेकसंग्राम पक्षावर लढण्याची वेळ अाली. भाजपच्या नेत्यांनी गाेटेंकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत गाेटेंना भाजप श्रेष्ठींच्या निराेपाची वाट पाहावी लागली. या काळात मुख्यमंत्री कार्यालयातून दूरध्वनी अाला. त्यानंतर त्या कार्यालयात अापण उमेदवारी यादी पाठवली, असे गाेटे यांनी सांगितले.

 

मंत्री महाजन, दानवेंनी डावलले
मुख्यमंत्र्यांनी अामदार गाेटेंना निवडणुकीचा मार्ग खुला करून दिला. मात्र, मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यात अाडकाठी अाणली, असा अाराेप गाेटे यांनी केला. साेमवारी रात्री झालेल्या बैठकीत महाजन यांनी पक्ष वाढवण्यासाठी इतरांना पक्षात प्रवेश दिले जात अाहेत. जळगावातही अाम्ही १६ जणांना अशीच उमेदवारी दिल्याचे सांगितले. मात्र, अामदार गाेटे यांनी धुळे भाजपमध्ये गुंडांना घेण्यास  विराेध कायम ठेवला. त्यामुळे पुढील प्रक्रियेत या दाेघांनी अापल्याला डावलले, असे अामदार गाेटे यांचे म्हणणे अाहे.

 

धुळ्यात दिवसभर नाट्यमय घडामोडी
मंगळवारी सकाळी ११.३० वाजता भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल हे अामदार गाेटे यांच्या निवासस्थानी अाले. त्यांनी अामदार गाेटे यांच्याशी बंद दाराअाड चर्चा केली. अापण पक्षश्रेष्ठींच्या अादेशावरून यादी घेऊन अालाे अाहे, असे अग्रवाल यांनी त्या वेळी सांगितले. ती यादी गोटेंनी पाहिली. मात्र, त्यातील २८ नावांवर हरकत घेत लाल शार्इच्या पेनाने त्यांच्या नावावर काट मारला. त्यातील १४ जणांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे अामदार गाेटे यांनी सांगितले. त्यानंतर गाेटे यांनी अापल्याजवळील उमेदवारांची यादी अग्रवाल यांना दिली. त्यावर, आपण तासाभरात पक्षश्रेष्ठींचा निर्णय कळवताे, असे सांगत अग्रवाल निघाले. या चर्चेनंतर दोघेही बाहेर अाले तेव्हा गाेटेंनी अग्रवालांच्या खांद्यावर हात ठेवला हाेता. त्यामुळे कार्यकर्त्यांना काही तरी चांगला तोडगा निघाल्याची जाणीव झाली. दरम्यान, अग्रवालांनी त्यांच्या सर्व ७४ उमेदवारांना अर्ज दाखल करायला सांगितले हाेते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी अाश्वासन दिल्यामुळे गाेटे निश्चिंत हाेते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत गाेटेंना काेणताही निराेप न मिळाल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत स्वतंत्र आपल्या पक्षावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

 

बातम्या आणखी आहेत...