आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली विधेयकांची माहिती, विधेयकांतील सरकारी भाषाही जाणून घेतली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - १६ डिसेंबरपासून नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकांची सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतली. यासोबतच काही प्रकल्पांचा आढावा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना मदत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती बैठकीस उपस्थित सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीत हिवाळी अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या विधेयकांवर सविस्तर चर्चा झाली. ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री झाल्याने अध्यादेशात वापरण्यात येणारी सरकारी भाषा आणि अध्यादेशाच्या क्रोनॉलॉजीची माहिती अत्यंत काटेकोरपणे त्यांनी घेतली. यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी प्रश्नही विचारले. सर्व बाबी समजावून घेतल्या.

फडणवीस सरकारच्या ३४ निर्णयांचा आढावा :


मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला. तसेच राज्यात शेतकऱ्यांनी पाच वर्षांत जी आंदोलने केली त्यावर चर्चा झाली. त्याचा आढावा घेऊन त्यावेळी दाखल झालेले अन्यायकारक गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाली. आंदोलनकर्ता कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ते बघितले जाणार नाही तसेच आकसाने वागणार नाही.  दरम्यान, शेतकरी कर्जमाफी योजनेचाही आढावा घेण्यात आला.