आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री NDRF ची नव्हे तर ED ची मदत मागण्यासाठी गेले होते, सचिन सावंतांचा घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या पाच वर्षात जनतेची फसवणूक करण्याचा धंदा राज्यातील सरकारने चालवला आहे, तो निदान आता तरी बंद करावा. एकरी मदत जाहीर केल्याशिवाय तरतूद हा शब्द अर्थशून्य असून 10 हजार कोटींची तरतूद केल्याचा सरकारी आदेश दाखवावा, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे. 
    

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, "राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नाही त्यामुळे पुरवणी मागण्यांचा प्रश्न येत नाही. मदत आणि पुनर्वसन विभागाचे बजेट यथातथाच आहे. त्यातही मुख्यमंत्र्यांनी 10 हजार कोटी रूपयांची तरतूद केली असे जाहीर केले, ते पूर्णपणे जनतेची दिशाभूल करणारी असून हा आदेश अद्यापही निघाला नाही. राज्याचा आपत्कालीन निधी फक्त 150 कोटी रूपयांचा आहे. तो वाढवून देण्याचा आदेश देखील निर्गमीत झालेला नाही, तसेच शासकीय परिभाषेनुसार ही अवकाळी पावसाने झालेले नुकसान आपत्कालीन परिस्थितीमध्ये गृहीत धरले जात नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे चर्चा केली हा पूर्णपणे दिखावा आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी राज्यावरील नव्हे भाजपवरील आपत्तीची चर्चा केली असून NDRF ची नव्हे तर ED ची मदत मागण्यासाठी गेले होते. असे नसेल तर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे किती कोटींच्या मदतीची मागणी केली ते सांगावे. याहूनही गंभीर बाब ही की शासनाने अद्याप प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी किती मदत देणार ते जाहीर केलेले नाही त्यामुळे 10 हजार कोटी रूपयांची तरतूद हा विषय अर्थशून्य आहे असे सावंत म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...