आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या देशात सार्वभौम सत्ता आहे याचे भान सर्वसामान्य लोकांना असायला हवे -'दिव्य मराठी'चे राज्य संपादक संजय आवटे यांचे मत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई येथे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात बोलताना 'दिव्य मराठी'चे राज्य संपादक संजय आवटे. - Divya Marathi
अंबाजोगाई येथे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात बोलताना 'दिव्य मराठी'चे राज्य संपादक संजय आवटे.

अंबाजोगाई : राजकारण घाणेरडे आहे असे म्हणण्यास सुरुवात झाली की अराजकता करणाऱ्यांचे फावते,' असे यशवंतराव चव्हाण यांनी फार वर्षांपूर्वी म्हटले होते. त्याचाच प्रत्यय आजच्या राजकारणात येत आहे. तेव्हा या राज्यावर कोणाचेच सरकार कायम नसते, लोक येतात आणि जातात. मात्र या राज्यात, या देशात तुमची आणि आमची कायम सत्ता असते, या देशात सार्वभौम सत्ता आहे याचे भान सर्वसामान्य लोकांना असायला हवे, असे मत दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई शहरातील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात दिव्य मराठीचे राज्य संपादक आवटे बोलत होते. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले.

मान्यवरांचे स्वागत यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सतीश लोमटे यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे व उद॰घाटक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांचा परिचय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मेघराज पवळे यांनी केले.

स्व. यशवंतरावांचे विचार जपण्याची गरज
 
देशाच्या भविष्याकडे दीर्घ पल्ल्याच्या विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचे विचार जपण्यासाठी अशा समारोहाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत, लेखक तथा जागतिक भाषांचे अभ्यासक पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उद॰घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या काळात यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती, त्यांचे विचार जपून ठेवणे हे खूप महत्त्वाचे काम आहे. या स्मृती जपून ठेवण्याची सुरुवात भगवानराव लोमटे यांनी ३५ वर्षांपूर्वी मित्रप्रेमातून केलेली असली तरी आज या स्मृतीला फार वेगळे महत्त्व व संदर्भ जोडले गेले आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या उभारणीच्या काळात अनेक संस्था निर्माण केल्या, समाज जोडण्याचे काम केले.

बातम्या आणखी आहेत...