आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी पालकांना दिले मतदानासाठी संकल्पपत्र , मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आसेगाव शाळेचा उपक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- येत्या 21 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालक मतदारांचे विद्यार्थ्यांमार्फत संकल्पपत्र भरून घेण्याचा स्तुत्य उपक्रम, गंगापूर तालुक्यातील आसेगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका गितांजली साळुंके यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून हाती घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाबाबत पाहिजे तशी जनजागृती होत नाही. ही बाब लक्षात घेत हा उपक्रम हाती घेतला. शाळेतील सर्व 450 विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना 30 सप्टेंबर रोजी पाठवण्यात आले आहेत.महात्मा गांधी जयंतीदिनाचे औचित्य साधुन उद्या बुधवार(दि.२ ऑक्टोबर) रोजी हे भरलेले संकल्पपत्र जमा करून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यासाठी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे सुपुर्द करणार असल्याचे गितांजली साळुंके यांनी सांगीतले. विशेष म्हणजे साळुंके व आपल्या मुलांच्या धडपडीला पालकांनी प्रतिसाद देत 'आम्ही यंदा निश्चित मतदान करूच' अशी दृढ हमी दिली आहे. याकामी गितांजली साळुंके यांना उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख मधुकर सुरडकर, मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, सुशीला घोडके, मधुकर इंगळे, परसराम धनेधर, कैलास गायके, रावसाहेब गवळी, उमा खोचरे, ज्योती जाधव, शीतल जाधव, मुजीब सय्यद, अमोल पल्हाळ यांचे सहकार्य लाभले.लोकशाही बळकट करण्यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी आईवडिलांसह पालक मतदारांनी मतदान प्रक्रियेत आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकांच्या सहकार्य व मदतीमुळेच ही जनजागृती करता आली. -गितांजली साळुंके (शिक्षिका, जि.प.कें.प्रा.शा.आसेगाव)असे आहे पालकांचे संकल्पपत्र
'आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त,निःपक्षपाती व शांततापुर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू. या निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. आमच्या कुटुंबातील सर्व मतदार, शेजारी, मित्रपरिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करू' असा मजकूर संकलपत्रात नमूद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...