आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवापूर- शहरातील स्मशानभूमीत जळावू लाकडे ठेवल्याने अंतिम संस्कार करणारे नागरिकांनी अडचण निर्माण होत असल्याने नवापूर नगर पालिकेचे प्रशासन तीन महिन्यांपासून जळावू लाकडे पडून असल्याने नागरिकांना अंतिम संस्कार करण्याची वेळी अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन उपाययोजना करणे गरजेचे आहे. नवापूर शहरातील एकमेव स्मशानभूमींची अवस्था मरणासन्न झाली आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी मोकळ्या जागी गेल्या तीन महिने पासून लाकडे अस्तवस्थ अवस्थेत पडलेली आहे. बहुतांश ठिकाणी हौद आहेत; पण त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि संध्याकाळी लावण्यासाठी लाइटही नादुरुस्त आहेत. स्मशानभूमीत येणारे लोक आधीच दु:खी असतात. अशा वेळी स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो.पावसाळ्यात तर स्मशानभूमींची अवस्था आणखीच भयंकर होते. काही स्मशानभूमीत तर पाऊस पडल्यावर बसण्याची ठिकाणी पाणी गळते. मैदानात पाणी साचते. मूलभूत सुविधा पुरवण्याची तसदी नगरपालिका घेत नसल्यामुळे या स्मशानभूमी अवस्था मरणासन्न झाली आहे. नगर पालिका प्रशासनाचा सूत्रांनी सांगितले लाकडे ओले असल्याने वाळण्यासाठी बाहेर ठेवण्यात आले आहे. लवकर स्मशानभूमीची दुरूस्ती केली जाणार आहे.
नवापूर स्मशानभूमीत शौचालयाची दुरावस्था
नवापूर शहरातील स्मशानभूमीत शौचालय खराब झाले आहे. प्रचंड दुर्गंधी येते शौचालय कोणी जात नाही बाहेरच जावे लागते त्यामुळे परिसरात दुर्गंधी व घाणीचे सम्राज पसरले आहे. बसण्याच्या ठिकाणी वाढलेले गवत घाणीमुळे डासांचे प्रादुर्भाव वाढलेले दिसून येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.