आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2013 मध्ये काँग्रेसला 45%, भाजपला 0.37% मते मिळाली, मात्र वर्षभरात काँग्रेसचे 5 दिग्गज पक्ष सोडून भाजपच्या गोटात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयझोल - २८ नोव्हेंबरला मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. ४० जागांसाठी ८ राजकीय पक्षांचे २०९ उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये सत्ताधारी काँग्रेस व मुख्य विरोधी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटचे सर्वाधिक ४०-४०, भाजपचे ३९, नॅशनल पीपल्स पार्टीचे ९ व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे ५ उमेदवार आहेत. जे आठ पक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यातील केवळ काँग्रेस (३४ आमदार), एमएनएफ (५) व मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स (आता झोराम पीपल्स मुव्हमेंटचा भाग) असे पक्ष आहेत त्यांच्याकडे विद्यमान विधानसभेत जागा आहेत. २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसला ४५%, एमएनएफला २८% मते मिळाली होती. झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) ७ प्रादेशिक पक्षांची आघाडी आहे. यातील दोन पक्षांनीच २०१३ ची निवडणूक लढवली होती. एमपीसीला ६% व झोराम नॅशलिस्ट पार्टीला १७% मते मिळाली होती. झेडएनपी अध्यक्ष लालदुहावमांच्या पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.

 

विशेष म्हणजे, २०१३ मध्ये भाजपला राज्यात केवळ ०.३७% मते मिळाली होती. हा भाजपचा राज्यातील सर्वात कमी मतांचा वाटा आहे. भाजप येथे १९९३ पासून निवडणूक लढत आहे. या वेळी तो काँग्रेसला लढत देत आहे. राज्यात निवडणुकीआधी तोडफोडीचे राजकारण सप्टेंबर महिन्यापासूनच सुरू झाले होते. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व गृहमंत्री आर. ललजिरलियाना व कॅबिनेट मंत्री ललरिनलियाना सायलो यांनी एमएनएफमध्ये प्रवेश केला होता. यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. बुद्धा धन चकमा व विधानसभा सभापती हिफेई भाजपच्या गोटात आले. हिफेई १९७० पासून काँग्रेसचे सदस्य होते. माजी संसदीय सचिव हमिंडेलोवा खियांगटे यांनीही काँग्रेस सोडून एनपीपीत दाखल झाले. याच्याशिवाय काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले. यामुळे भाजप व अन्य प्रादेशिक पक्षांचा आत्मविश्वास उंचावला आहे.


 राज्यातील ३ मोठे पक्ष काँग्रेस, एमएनएफ व झेडपीएम एकमेकांवर निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा आरोप ठेवत आहेत. भाजपवर हिंदुत्वाच्या अजेंड्यावरून निशाणा साधला जात आहे. राज्यात ९०% लोकसंख्या ख्रिश्चन आहे हे याचे कारण. एमएनएफ, भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स(नेडा)चा भाग आहे. म्हणजे, एकूण काय तर भाजपचे फिअर फॅक्टर काम करताना दिसत आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने गृह सचिवांना हटवण्याची कृती वादाचे कारण ठरले आहे. यानंतर मिझो एनजीओने निवडणूक आयोग ब्रू जमातीला मतदानापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप केला. या जमातीने १९९७-९८ मध्ये मिझोराम सोडले होते. ते पोस्टल मतदान करतात. ब्रू जमातीचे ११ हजार मतदार आहेत. मिझोराममध्ये १ जागेसाठी साधारण १९ हजार मतदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...