Home | Maharashtra | Vidarva | Akola | The Constitution burnt down, Youth protest front of police station

पोलिस ठाण्यावर धडकला युवकांचा माेर्चा; संविधान जाळल्याचे पडसाद, गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी | Update - Aug 12, 2018, 12:56 PM IST

दिल्ली येथे संविधान जाळल्याचा दावा करत युवकांनी शनिवारी थेट सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यावर धडक दिली.

 • The Constitution burnt down, Youth protest front of police station
  अकाेला - दिल्ली येथे संविधान जाळल्याचा दावा करत युवकांनी शनिवारी थेट सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यावर धडक दिली. युवकांनी पोलिसांना तक्रार देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी युवकांनी पोलिस स्टेशनसमाेर घाेषणा दिल्या.

  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे भारताचे स्वातंत्र्य आणि लोकशाही अभेद्य राहिली आहे. भारतीय संविधान ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला दिलेली अनमोल देणगी आहे. मात्र विश्वातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाला दिल्लीतील जंतर मंतर येथे जाळण्याचे अत्यंत निंदनीय निषेधार्ह कृत्य काहींनी केले. या निंदनीय कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत अाहे. दरम्यान या प्रकाराचा निषेध करीत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात अाली.

  हे अाहे तक्रारीत : संविधान जाळल्याप्रकरणी कारवाई व्हावी, यासाठी मुरली रामभाऊ पखाले यांनी सिटी काेतवाली पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यात संविधान जाळल्याची व्हायरल झालेल्या चित्रफितीमधील श्रीनिवास पांडे, संजय शर्मा, अनुप दुबे, कृष्णमाेहन राय व रोहित गुप्ता नामक व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात अाली अाहे.

  या कलमान्वये गुन्हा दाखल करा : संविधान जाळल्याप्रकरणी गैरअर्जदारांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली अाहे. यात भादंिवचे कलम १२० (ब- कट कारस्थान रचणे), १२४ (अ), १५३क, ५०६, ५११ व ३४ तथा महापुरुष अवमानना कायदा १९७१ व अायटी अॅक्टचे कलम ६७, ६८ आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती अत्याचार निवारण कायदा ३ (१) (१०),३ (१५) नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात अाली. तक्रार भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांची तसेच बहुजन क्रांती मोर्चा , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून करण्यात अाली आहे.

  असा निघाला माेर्चा : संविधान जाळल्याप्रकरणी कारवाई हाेण्यासाठी काढण्यात अालेल्या माेर्चाला अशाेक वाटिका येथून प्रारंभ झाला. माेर्चा मुख्य डाक घर, मदनलाल धिंग्रा चाैक (मध्यवर्ती बस स्थानक), डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, गांधी राेड या मार्गाने सिटी काेतवालीवर धडकला. याप्रसंगी राहुल इंगळे, सारंग निखाडे, अॅड. सी.ए. दंदी, नरेंद्र सदांशिव, प्रशिक अाठवले, बाबाराव साखरे, अाकाश चापके,िवक्की पळसपगार, स्वप्निल कुलट, करण तेलगाेटे, अक्षय शिरसाट, चंदन वानखडे, नंदू धाकडे, याेगेश जायले, सिद्धांत चऱ्हाटे, अमर गायकवाड, दाैलत जवंजाळ, नीरज शिरसाट अादी उपस्थित हाेते.

Trending