आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपर्क प्रमुख म्हणाले ही तर बेशिस्त, पक्ष याचा विचार करेल; अामदार म्हणाले हा बालिशपणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण- गटबाजी साेमवारी शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य वितरण वितरणासारख्या संवेदनशील कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाट्यावर अाली. कार्यक्रमापासून डावलण्यात अाल्याचा अाराेप करीत आमदार गाेपिकिशन बाजाेरीया यांनी कार्यक्रम सुरु असतानाच युवा सेना पदाधिकाऱ्यांशी स्वत:च्या निवासस्थानी चर्चा केली.

 

त्यांच्यासह शिवसेना, युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमानंतर संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत आणि अामदार बाजाेरीया यांनी पत्रकारांशी बाेलताना एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेप केले. कळवूनही कार्यक्रमाला न येणे ही बेशिस्त असून, ते शिवसेनेत खपवून घेतले जात नाही आणि यावर पक्ष विचार करेल, असा सूचक शब्दात खा. सावंत यांनी एका प्रकारे कारवाईचे संकेत िदले. यावर अा. बाजाेरीया यांनीही पलटवार करीत खा. सावंत यांचा हा बालिशपणा असून,मलाही विचार करावा लागेल, असे म्हणाले. अा. बाजाेरीया यांच्या बाेलण्यातून त्यांनीही कंबर कसत असल्याचे अप्रत्यक्ष संकेत प्राप्त झाले. दाेन्ही नेत्यांच्या पवित्रावरुन शिवसेनेतील संघर्ष वाढणार कि कमी हाेणार, हे पाहणे अाैत्सुक्याचे राहणार अाहे.

 

भाजपप्रमाणेच शिवसेनेत प्रचंड गटबाजी अाहे. एका गटात खा. सावंत-जिल्हा प्रमुख नितीन देशमुखांसह इतर पदाधिकारी आणि दुसऱ्या गटात अा. बाजाेरीया- युवा सेनेचे पदाधिकारी व काही महिला पदाधिकारी अाहेत. दाेन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी साेडत नाहीत. ही गटबाजी संपुष्टात अाणण्यात विदर्भ संपर्क नेते तथा मंत्री दिवाकर रावते यांनाही यश अालेले नाही. अशातच साेमवारी शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाट्यावर अाली. कार्यक्रमापासून डावलण्यात अाल्याच्या अाराेपानंतर युवा सेनेचे पदाधिकारी कार्यक्रमापासून जवळच असलेल्या अा. बाजाेरीया यांच्या निवासस्थानी जमले. यात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, िवजय मालाेकार, उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरुमकार, श्रीप्रभु चापके, याेगेश अग्रवाल, याेगेश बुंदेले, नगरसेवक शशिकांत चापडे अादींसह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते. पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा दाेन्ही ठिकाणी हाेते. ते समेट घडण्याबाबत हालचाली करताना दिसून अाले.

 

युवासेनेसह अामदार बाजाेरीयांची पाठ; कार्यक्रम सुरु असतानाच युवा सेनेशी चर्चा
शिवसेनेच्या वतीने साेमवारी िजल्ह्यातील १०७ शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांना िवविध साहित्याचे िवतरण केले. या वेळी उपस्थित मान्यवर


हकालपट्टी व प्रवेशाची किनार
शिवसेनेची अंतर्गत गटबाजीला पक्षातून िज.प.सदस्यांनी झालेली हकालपट्टी, प्रवेशाची किनार अाहे,अशी चर्चा हाेती. अडीच वर्षांपूर्वी जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दाेन िज.प.सदस्यांनी शिवसेनेचा समावेश असलेल्या महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान केले नव्हते. परिणामी दाेन्ही सदस्यांना पक्षातून काढले. त्यापैकी एक चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. या प्रवेशाला खा. सावंत-देशमुख गटाचा िवराेध अाहे. अा. बाजाेरीया गटाने भाजपचे नेते, प्राचार्य श्रीप्रभु चापके यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून अाणला. या प्रवेशापासून खा. सावंत गट लांब हाेता. यातून ही गटबाजी वाढत असून, अाता या कार्यक्रमानिमित्त अंतर्गत कुरघोडीचे राजकारण चव्हाट्यावर अाले.


असे झाले वार-पलटवार
खा. सावंतच बेशिस्तपणे वागताहेत
खा. सावंतच बेशिस्तपणे वागत असून, त्यांच्या कामाबाबत मला काही बाेलायचे नाही. मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, अादित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार काम करताे. पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनसुार- ध्येयधाेरणांनुसार चालताे. काही कारणांस्तव युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्यक्रमाला अाले नाहीत. त्यामुळे युवा सेनेचे पदाधिकारी माझ्या घरी अाले. त्यांनी मलाही तेथे जावू दिले नाही. येथेच अाम्ही पुढील कार्यक्रमाबाबत चर्चा केली.मी युवा सेनेच्या पाठीशी अाहे. गाेपिकिशन बाजोरिया, अामदार, शिवसेना.
शेतकरी कुटुंबीयांना अन्नधान्य िवतरण सुरु असतानाच अामदार गाेपिकिशन बाजाेरीयांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांशी स्वत:च्या िनवासस्थानी चर्चा केली.


हा कार्यक्रम शिवसेनेचा हाेता
कार्यक्रम हा खासगी नव्हे; तर शिवसेनेचा हाेता. संपर्क प्रमुख या नात्याने मी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठका घेतल्या. अामदार बाजोरीया यांना कार्यक्रमाबाबतचे पत्र दिले, निराेपही दिला. तरीही ते गैरहजर राहत असल्यास ही बेशिस्त वागणूक असून, शिवसेनेत बेशिस्त खपवून घेतली जात नाही. कार्यक्रमाचे उत्कृष्ट िनयाेजन व अंमलबजावणी िजल्हाप्रमुखांसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले. काेणी काहीही बाेलत असले तरी त्यांचे दुखणं वेगळे असते. कार्यक्रमापासून कोणालाही डावलण्यात अाले नाही. अशी कामं मी कधी केलेली नाहीत. खासदार अरविंद सावंत, संपर्क प्रमुख, शिवसेना.


अनेक तर्क
युवा सेना प्रमुख अादित्य ठाकरे यांच्या दाैऱ्याच्या िनयाेजनात आणि यासाठी संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेला अा. गाेपिकिशन बाजाेरीया आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप नव्हते. अादित्य ठाकरे प्रथम अकोल्यात सकाळी विमानतळावर येणार अाणि त्यानंतर ते कारने मेहकर येथे जावून दुपारी अकाेल्यातील कार्यक्रमासाठी येणार, असा दाैरा हाेता. मात्र प्रत्यक्ष साेमवारी कार्यक्रमाच्या िदवशी वेगळेच घडले. अादित्य ठाकरे अाैरंगाबाद येथे अाले आणि तेथून ते मेहकर येथे पाेहाेचले आणि मेहकर येथूनच परत अाैरंगाबादकडे रवाना झाले. या बदलामागे कार्यक्रमातील बदल, वाहन उपलब्ध न हाेणे, वाहनातील बिघाड ही कारणे अाहेत िक त्यांच्या न येण्याला अंतर्गत गटबाजी-कुरघोडीच्या राजकारणाची किनार अाहे काय, असे अनेक तर्क कार्यक्रमस्थळी खासगीत लावण्यात येत हाेते.

बातम्या आणखी आहेत...