आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Controversy Over Costumes On Priyanka Chopra And Jennifer Lopez

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियंका चोप्रा आणि जेनिफर लोपेज यांच्या वेशभूषेचा वाद

एका वर्षापूर्वीलेखक: जयप्रकाश चौकसे
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील एका पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्रा जोनास अर्धे शरीर झाकणारे कपडे घालून सहभागी झाली. भारतीय माध्यमांत हा विषय चवीने चघळला गेला. नैतिकतेचे स्वयंभू ठेकेदार सोशल मीडियावर सक्रिय झाले. अशा संधी या लोकांना आयतेच कोलीत प्रदान करतात. अमेरिकन माध्यमांनी याला फार महत्त्व दिले नाही. ७ वर्षांपूर्वी जेनिफर लोपेज अशाच प्रकारचे कपडे घालून मनोरंजन क्षितिजावर प्रकट झाली, याचाही उल्लेख केला नाही. फरक एवढाच की, जेनिफर लोपेजच्या शरीरावर छटाकभर जराही अतिरिक्त वजन नव्हते, तर प्रियंका थोडीशी गुबगुबीत दिसत होती. वस्त्रप्रावरणाच्या बाजाराची एक युक्ती आहे. किमान वस्त्रे अधिक किमतीत विकली जातात. नेक टाय, बो, अंडरविअर, रुमाल आणि ब्रा अतिशय महागडे आहे. एक गाणेही तयार झाले होते- ‘कमीज फाडकर रूमाल बना लो और डॉलर नहीं तो कमीज का कॉलर चलेगा.’ निर्माते, कलाकार आणि ड्रेस डिझायनर चर्चा करून चित्रपटासाठी पोशाख तयार करत असतात. या व्यवसायातील मनीष मल्होत्रा यांचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष. ‘जॉली एलएलबी’ चित्रपटात सौरभ शुक्लाने जजचे पात्र अभिनीत केले. खटल्यादरम्यान ते आपल्या एकुलत्या मुलीच्या लग्नाचीही तयारी करत असतात. मुलीचा हट्ट असा की, मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेसच परिधान करणार. वकील सांगतात की मनीष मल्होत्राने तयार केलेले कपडे ७-८ लाखात मिळतात. जजचे वेतन इतके नसते. सुभाष कपूरच्या चित्रपटात सामाजिक विषमतेवर विडंबन केलेले असते. त्यांचा ‘बुरे फंसे ओबामा’ अत्यंत रोचक चित्रपट. कलाकारांची अंतर्वस्त्रेही महागड्या डिझायनरने बनवलेली असावीत, अशी अनेक निर्मात्यांची मागणी असते. असे कपडे घातलेले कलाकार उत्तम अभिनय करतात का? कपड्यावरील लेबल अतिशय महत्त्वाचे. इंदूरचे डॉक्टर मधुसूदन द्विवेदी परदेशातून येताना लेबल खरेदी करून आणायचे. मुंबईच्या बाजारातून कपडे घेऊन त्यावर ते लेबल चिकटवायचे. त्यातून नातेवाइकांची हौस पूर्ण व्हायची. एका योगगुरूंचा मोठा व्यवसाय आहे. नानाविध उत्पादने ते विकतात. मात्र मंदीचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरही झाला आहे. असे एखादे योगासन शोधता येईल काय, की ज्यामुळे महागाई दूर पळेल? व्यवस्थेलाही अशाच जादूच्या छडीची प्रतीक्षा आहे. अर्थसंकल्पाने वास्तव झाकोळले आहे. सूटकेस घेऊन येण्याऐवजी अर्थमंत्री वहीखाते घेऊन आल्या एवढाच काय तो बदल. त्यावर दोन्ही बाजूंनी लाभ लिहिला आहे. राजकीय लाभ व निवडणूक जिंकण्याचा मंत्र. राजेश खन्ना-शर्मिला टागोरच्या ‘सफर’मध्ये आय. एस. जोहरने नायिकेच्या भावाची भूमिका केली होती. त्यांना कविता रचण्याची हौस. मृत्यूवर महाकाव्य लिहायचे असल्यास ते स्मशानात बसून लिहावे असा अफलातून विचार. याच धर्तीवर अर्थसंकल्पाची रचनाही बाजारात बसूनच करायला हवी. प्रियंकाची वेशभूषा आर्थिक स्थिती अन् कोरोनाच्या साथीहून जास्त चर्चिली गेली. महत्त्वाच्या मुद्द्यांवरून, घटना-घडामोडींवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या या काळात दुसरे काय घडणार?