Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | The corporation's e-mail fatwas organized the meeting with Metakutila

महामंडळाच्या ‘ई-मेल’ फतव्यांनी संमेलनाचे आयोजक मेटाकुटीला

प्रतिनिधी | Update - Nov 10, 2018, 09:15 AM IST

या संदर्भात यवतमाळच्या आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीही बोलण्यास नकार दिला

 • The corporation's e-mail fatwas organized the meeting with Metakutila

  नागपूर - यवतमाळ येथे नियोजित साहित्य संमेलनात अजूनपर्यत कोणताही वाद उपस्थित झालेला नसला तरी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या एकांगी कारभाराविषयी दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. जोशी यांच्या दहशतीमुळे कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. या संदर्भात यवतमाळच्या आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीही बोलण्यास नकार दिला. यावरून जोशी यांच्या दहशतीची कल्पना यावी.


  एरव्ही महामंडळाची स्वायत्तता आणि संलग्न तसेच घटक संस्थांच्या स्वातंत्र्याविषयी कंठशोष करून बाेलणारे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांंच्या नवनवीन सूचनावजा फतव्यांनी आयोजक संस्थेचे काम सोपे होण्याऐवजी किचकट आणि गुंतागुंतीचे होत असल्याचे सांगितले जाते. संस्थासंचालन, संस्थेचे कामकाज व निर्णय प्रक्रियेत कागदांऐवजी संवाद माध्यमांच्या नवतंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी आग्रही भूमिका घेणाऱ्या जोशींनी आयोजक संस्थेला रोज नवनवीन “ई-मेल’ फतवे पाठवून त्रस्त करून सोडल्याने एकदाचे संमेलन उरकण्याच्या मानसिकतेत आयोजक संस्था आली असून त्यांच्या सुरूवातीचा उत्साह पार मावळल्याचे समजते. आयोजक संस्थेच्या स्वातंत्र्याचा संकोच करून सर्व कारभाराची सूत्रे जोशींनी स्वत:कडे घेतल्याने आयोजक परेशान झाले असून या विषयी काहीच बोलता येत नसल्याने आयोजकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली अाहे.


  यवतमाळ येथील आयोजक संस्थेतील एका पदाधिकाऱ्याच्या विवेकशून्य कारभारामुळे आयोजकांना मनस्ताप होत असल्याचे बोलल्या जात आहे. हा पदाधिकारी ऊठसूठ जोशींसोबत संपर्क साधून त्यांना बित्तंबातमी देत असल्याने जोशींचे मन कलुषित होत असल्याचे सांगितले जाते. आयोजक संस्थेतील हा कब्जाकलुशी कोण, या विषयी साहित्य वर्तुळात चर्चा सुरू आहे.

  प्रवेशद्वारांना देणार साहित्यिकांची नावे
  डाॅ. य. खु. देशपांडे, पा. श्रा. गोरे, भाऊ मांडवकर, भाऊसाहेब पाटणकर, शंकर बडे अशी मोठी साहित्यिकांची मांदियाळी यवतमाळात आहे. परंतु संमेलनात त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारा एखादा कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. या बाबत जोशी यांना पत्र परिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी उडवून लावला होता. मात्र आयोजक संस्था प्रवेशद्वार तसेच सभा मंडपांना त्यांची नावे देणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

  संमेलनाचा लोगोही बदलला
  आयोजक संस्थेच्या कारभारातील जोशी यांची लुडबुड सारखी सुरू असते. त्यातूनच संमेलनाचा सर्वानुमते मंजूर झालेल्या लोगोतही बदल करण्यात आले. आधीच्या लोगोमध्ये यवतमाळ नगर परिषदे इमारतीच्या पार्श्वभूमीवर लोकनायक बापूजी अणे यांचा अर्धपुतळा, त्या नंतर कापसाच्या बोंडांवरस्थित तीन पुस्तके, त्यावरील दौत आणि वही असा होता. नव्या लोगोत लोकनायक बापूजी अणे यांच्या उंच पुतळ्यासमोर नगर परिषदेची इमारत आहे. तसेच तीन ऐवजी दोनच पुस्तके ठेवण्यात आली असून कापसाची बोंडे पुस्तकाच्या कडेला करण्यात आली आहे. खरे म्हणजे या पूर्वीचा लोगोही चांगला होता. त्यात काहीही न्यून नव्हते. तरीही केवळ अट्टाहासामुळे लोगो बदलण्यात आल्याची चर्चा आहे.

  ...त्यांनीच संमेलने करायची असतात
  महामंडळाच्या मार्गदर्शन समितीचे व पदाधिकाऱ्यांचे काम महामंडळाच्या वतीने महामंडळाच्या असलेल्या ह्या संमेलनाचे ठरलेले काम त्याच्या बारीकसारीक तपशीलासह नेटके, नेमकेपणाने, वेळच्यावेळी, यथायोग्यरित्या चालले आहे अथवा नाही हे बघण्याचे व वेळच्या वेळी ते होईल हे बघण्याचे, त्याचा आढावा घेण्याचे, प्रत्यक्ष पाहणी करण्याचेही आहे, असे जोशी यांनी

  मराठी’शी बोलताना सांगितले.
  वेळच्या वेळी काम होते की नाही हे पाहाण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या भरपूर तपशीलवार सूचना देखील करीतच राहाव्या लागणार व त्यांचे वेळच्यावेळी पालन करायलाही सांगून ते करवूनच घ्यावे लागणार आहे. हे करण्यात ज्यांना आनंंद वाटतो त्यांनीच अशी कामे व अशी संमेलने करायची असतात. मात्र त्याचा कोणाला त्रासही होतो असे वाटत असल्यास त्याचे आनंदात रूपांतर करण्याची कला त्यांनी शिकून घ्यायला हवी. ही त्यासाठी संधी आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

Trending